एक्स्प्लोर

Makar sankranti 2022 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीला देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर राहणार बंद

मकर संक्रातीला ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर देखील बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

पुणे :  कोरोनाचा वाढता लक्षात घेता सरकारने काही निर्बंध घातले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मकर संक्रांतीला  ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मकरसंक्रांती निमित्ताने माऊलींना आणि संत तुकाराम महाराज यांना ओवसा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येत असतात, यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 जानेवारीच्या पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे.

देहूत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशातच मकर संक्रांतीला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मकर संक्रातीच्या सणाला मोठ्या सख्येने भाविक इथे येत असतात. वाढणाऱ्या गर्दीमुळे भाविकांना कोरोनाची लागण झाली तर ते त्यांच्या गावातही कोरोनाचा प्रसार करू शकतात. हा धोका लक्षात घेता, संक्रांतीला दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थानने भाविकांना देहूत न येण्याचं आवाहन केले आहे.

मकर संक्रातीच्या दिवशी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून महिला विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना ओवसा वाहण्यासाठी देहू मध्ये दाखल होतात. मात्र मागील दोन वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळं सर्व देवस्थाने बंद होती. त्यामुळे सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे करता आलेले नाहीत. यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने तसेच मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देवस्थान प्रशासनान हा निर्णय घेतला आहे.

मकरसंक्रांती निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींना ओवसा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत देखील येत असतात. कोरोनाचा, तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव राज्यभर फैलावत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता संभाव्य गर्दी टाळण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनेही माऊलींचे संजीवन समाधी मंदिर गुरुवारपासून शनिवारपर्यंत म्हणजे 13 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीची माहिती संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
'3-3-2025 को राजीनामा होगा!'; करुणा शर्मांचा शब्द खरा ठरणार, धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Scenes Superfast News : 9 सेकंदात बातमी : Superfast News : ABP Majha : Maharashtra NewsBudget Session Assembly : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अजित पवारांसमोर कोणती आव्हानं?Raksha Khadse Daughter : रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना अटकTop 70 News : Superfast News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
शिवरायांचा अपमान, इंद्रजित सावंतांना धमकी देत फरार झाला, पण अंतरिम जामीन मिळताच प्रशांत कोरटकर व्हिडिओतून प्रकट झाला, पण पोलिसांना अजून सापडला नाही!
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
आई बायकोच्या भांडणात हैराण होऊन गेला, दोन वर्षापूर्वी लग्न केलेल्या तरुणाने धावत्या रेल्वेतून उडी घेतली; म्हणाला, 'भावांनो लग्न करा, पण पहिल्यांदा..'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे आज राजीनामा देणार की घेतला जाणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात हायव्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता
'3-3-2025 को राजीनामा होगा!'; करुणा शर्मांचा शब्द खरा ठरणार, धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Gautam Gambhir : त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!
Pune Crime Swargate: तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
तरुणीला शरीरसंबंधासाठी 7500 रुपये दिले म्हणणाऱ्या दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये, पोलिसांना मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं?
Raksha Khadse: रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात;  मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा
Embed widget