एक्स्प्लोर

Ajit Pawar On Sunil Tingre: दादा, सुनील टिंगरेंकडे शंकेने बघितलं जातंय, पत्रकारांचा प्रश्न; अजित पवार म्हणाले, चौकशी करू द्या ना !

Pune Porsche Car Accident: रात्री उशीरा सुनील टिंगरेंना फोन आला. आता फोन कोणाचा आला हे त्यांनी सांगितलं आहे. मग सुनील टिंगरे पोलीस स्टेशनला गेले होते, असं अजित पवार म्हणाले.

पुणे:  पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघाताच्या (Pune Porsche Car Accident) दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यानंतर सुनील टिंगरेंकडे देखील संशयानं पाहिलं जात आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Sunil Tingre) यांनी आज माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरेंची बाजू मांडली. 

स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे शंकेने बघितले जातंय, असं पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, चौकशी करु द्या ना, मी पण बारामतीचा 32 वर्षांपासून आमदार आहे. आम्ही कामामुळे मुंबईत असतो, कधी पुण्यात असतो. मी मतदार संघात नसतो. जे आमदार असतात, ते बहुतेक त्यांच्या मतदारसंघात असतात. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास त्यांना संबंधित ठिकाणी जावं लागतं. एकदा सुनील टिंगरेंच्या मतदासंघात स्लॅब कोसळला होता. त्यावेळीही ते मदतीला धाऊन गेले होते. तसेच या घटनेत निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यामुळे सुनील टिंगरे त्या ठिकाणी गेला आणि दोषींवर कारवाई करण्यास सांगितले होते,  अशी जूनी आठवण सांगत अजित पवारांनी सुनील टिंगरेंची बाजू मांडली.

लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या ते करतात. ज्यावेळेस आपल्या पुण्यात पूर येतो, एखादी घटना घडते तेव्हा स्थानिक आमदार उपस्थित असतात, घटनास्थळी जातात आणि मदत करण्याच्या प्रयत्न करतात. जे कोणी दोषी असतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचं ते सांगतात, असं अजित पवार म्हणाले. सदर अपघात रात्री उशीरा घडली. रात्री उशीरा सुनील टिंगरेंना फोन आला. आता फोन कोणाचा आला हे त्यांनी सांगितलं आहे. मग सुनील टिंगरे पोलीस स्टेशनला गेले होते. सुनील टिंगरेंनी कोणालाही पाठिशी घाला, असं सांगितलं नाही, असं अजित पवारांनी सांगितले. पोलीसांनी योग्य ती कारवाई करत असल्याचं अजित पवार म्हणाले. 

अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक-

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना क्राइम ब्रांचने ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आता अल्पवयीन मुलगा आणि आई शिवानी अग्रवाल यांची एकत्रित चौकशी करणार आहेत. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल. 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Nasrapur Crime: अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Girl Death Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात न्यायाधीशांचा एकच प्रश्न; आरोपी म्हणाला...
नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात न्यायाधीशांचा एकच प्रश्न; आरोपी म्हणाला...
Pune IMD News: पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
Pune Crime : कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?
कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Embed widget