Ajit Pawar: मी तापट अन् कडक आहे, पण उगीच कुणावरही चिडत नाही, असं का म्हणाले अजित पवार....
Pune Ajit Pawar: मी पण तापट अन् कडक आहे, मी कोणावरही उगाच चिडत नाही, कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर चिडतो.
Pune Ajit Pawar: पुण्यात ज्या सुभाष जगताप यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे, त्यांचा अधिकाऱ्यांना धमकी देण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याची आठवण करत जगताप तापट आहेत, मी पण तापट आहे, पण नेमकं मला हेच आवडत नाही अधिकाऱ्यांना मानसन्मान दिला पाहिजे. मी पण तापट अन् कडक आहे, मी कोणावरही उगाच चिडत नाही, कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर चिडतो. अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग पगार दिला, कोट्यवधी रुपये पगार देतो हा आकडा वाढत आहे. दीड लाख कोटी नुसते पगारावर जात असतील तर अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. काहीही झालं तर सरकारी पगार रखडत नाहीत. बाकीच्याच तसे नाही शेतकरी, कामगार, दुकानदार यांचं वेगळं आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांकडून कामाची अपेक्षा असते, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढलेल्या आदेश म्हटलेय की, माझ्याशिवाय कार्यक्रम करू नका, पण कोणी बोलावत नसेल म्हणून हे आदेश काढले असतील. अरे पालकमंत्र्यात पण धमक पाहिजे. सर्व नेत्यानी ऐकलं पाहिजे. त्यामुळं सगळे आपापल्या नेत्यांना बोलवतात आलं पाहिजे. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आले आहेत. मोदींकडे बघून मतदान करा, तुमच्यात धमक असेल तर तुम्ही मतदान मागा ना, इकडे याच्यासाठी तिकडे त्याच्यासाठी मतदान मागितले जाते. आज पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याच काम केलं, उद्याचे पन्नास शंभर वर्षे बघून काम करा असं सागितले, असे अजित पवार म्हणाले.
नेतृत्वाला व्हिजन असल्याशिवाय काम होत नाही. आज ऑटो हब म्हणून पुणे पिंपरीकडे पाहिले जाते. तोडतोडी फोडाफोडी करू राजकारण करून स्थिरता राहत नाही. आता सरकार कसं आलं तुम्हला माहिती आहे. स्थिरता असेल तर अधिकारी काम करतात पण आता बघा काय चालले आहे, आता उद्योग गेले, नोकऱ्या गेल्या, उद्योग गेल्याच दुःख लोकांना आहे पण राजकारण्यांना नाही, असेही अजित पवार म्हणाले.
योगी महाराज महाराष्ट्रात आले, ते इकडून येऊन आपल्या उद्योगवर डल्ला मारत आहेत. आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करत आहेत, असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला. सगळयात जास्त बेरोजगारी आपल्या महाराष्ट्रात आहे. मंत्रिमंडळ विस्तार अजून नाही, अगोदर दोनच टीकोजीराव सरकार चालवत होते, परत मंत्रिमंडळ विस्तार केला, तर एका एकाला सहा सहा मंत्रालय दिले. परत सावित्रीबाई फुले जिजाऊच्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, असा हल्लाबोलही यावेळी अजित पवार यांनी केला.