Ajit Pawar: गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
Ajit Pawar: आज अजित पवारांनी बारामतीमध्ये पोलिसांसोबत सकाळी बैठक घेतली. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली, गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील त्याबाबत अजित पवारांनी पोलिसांसोबत चर्चा केली.
बारामती: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तर पुणे शहरासह बारामतीमध्ये देखील गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या गुन्ह्यांच्या घटना घडल्या. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज अजित पवारांनी बारामतीमध्ये पोलिसांसोबत सकाळी बैठक घेतली. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली, गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील त्याबाबत अजित पवारांनी (Ajit Pawar) पोलिसांसोबत चर्चा केली. यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना पवार म्हणाले, शाळा, कॉलेज, ऑफीस याठिकाणी तक्रार पेट्या बसवल्या जातील. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह नावाची हेल्पलाईन २४/७ चालू करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे.
यावेळी त्यांनी महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी आणि बारामतीत होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत अजित पवारांनी (Ajit Pawar) बड्या पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बारामतीत एक गुन्हेगारीची घटना घडली, कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न का निर्माण होतो, याचा आढावा आज पोलिसांनी घेतला आहे. पुन्हा अशा घटना घडणार नाहीत यासाठी पावले उचलणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी पोलिसांशी चर्चा करून शक्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुन्हेगारी, अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या रोखण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. शक्ती बॉक्स तक्रार पेटी प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात, ऑफीसमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये काही तक्रार असेल तर टाकतील. त्या तक्रारदारांचं नाव गुपीत ठेवण्यात येईल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ठेवणे गरजेचे आहे, शाळा, महत्त्वाचे चौक, स्टँड दवाखाने याठिकाणी नंबर लावण्यात येतील. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह नावाची हेल्पलाईन 24/7 चालू करण्यात येणार आहे. 9209394917 हा हेल्पलाईन नंबर यावेळी अजित पवारांनी सांगितला आहे.
ज्यांच्याकडे हत्यार सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सोशल मिडियावर जे लोक हत्यारे, कोयता, पिस्तूल घेऊन फोटो टाकतील त्यांच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. बारामतीला काळिमा फासणारी घटना घडली, कोयत्याने एकाचा खून करण्यात आला. दोघेही 17 वर्षाचे आहेत.आताच्या काळात मूल स्मार्ट आहे. आपल्या काळात पाचवीत असताना विचारलेले प्रश्न लहान मूल आता विचारतो.17 वर्षांच्यांना माहीत आहे आपण गुन्ह्यात अडकत नाही. त्यामुळे आता हे वय 14 वर वय आणता येईल याचा विचार सुरू आहे, याबाबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा करून त्यांना पक्ष देणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली
30 सप्टेंबर रोजी बारामतीमध्ये दिवसाढवळ्या तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्याच्या (Baramati Student Murder) झालेल्या खुनाने बारामती हादरून गेली आहे. बारामतीमधील प्रसिद्ध अशा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याने हा खून केल्याची माहिती समोर येत आहे. या दोन विद्यार्थ्यामध्ये कडाक्याचे भांडण झालं होतं आणि भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत गेल्याची माहिती समोर आली आहे.हल्ला करण्यात आला तेव्हा दोघेजण होते. यामधील एक जण पळून गेला असून एक जण पोलिसांना सापडला. दरम्यान, हा खून चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूलाच झाला.