(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामतीमध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.
Pune Crime : पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढता आलेख सुरुच असताना आता बारामतीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बारामतीमध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र, या विद्यार्थ्यांचा खून महाविद्यालयाच्या परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला.
बारामतीमधील मैत्रिणी पुण्यात मित्राच्या खोलीवर गेल्या अन्
दुसरीकडे, 14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या 14 सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या. बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले.
मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने आळीपाळीने लैंगिक शोषण केले. दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले.
16 तारखेला या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणलं. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे समोर आली.
इतर महत्वाच्या बातम्या