एक्स्प्लोर
एकविरा देवीच्या पालखीत तुंबळ हाणामारी, तोडफोडीत लाखोंचं नुकसान

लोणावळा: कार्ल्याच्या एकविरा देवीच्या पालखी मिरवणुकीत काल दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पालखीच्या मानातून पेणकर आणि ठाणेकरांमध्ये हा वाद झाला. काल सकाळ पासून महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो भाविक गडावर आले होते. पालखीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सायंकाळी ५ पासून गर्दी केली होती. पण पालखीच्या वेळी मानावर वाद झाल्यानं पालखी सोहळ्याला गालबोट लागलं. पेणकरांनी ठाणेकरांच्या तावडीतून पालखी हिरावून घेतली आणि मिरवणूक काढल्यानं वादला सुरुवात झाली. त्यामुळं संतप्त झालेल्या ठाणेकरांनी पालखीचा मान हिरावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठाणेकरांनी गडावर तोडफोड केली. तसेच भाविकांवरही हल्ला केला. या तोडफोडीत किमान दहा लाख रुपयांचं नुकसान झालं. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई मागणी एकविरा देवस्थान ट्रस्टनं केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग























