एक्स्प्लोर
भरदुपारी स्विमिंग पूलमध्ये दररोज पोहायला येणारं पुण्यातील माकड
पुणे शहरातील कॅम्प परिसरात शाहू जलतरण तलावावर एक माकड गेल्या काही दिवसांपासून दररोज पोहण्यासाठी येत आहे.

पुणे : सध्याच्या कडक उन्हाळ्याने शरीराची लाहीलाही होत आहे. त्यामुळे आपण या तापमानापासून वाचण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करतो. या उन्हाला त्रास केवळ आपल्यालाच नाही, तर प्राण्यांनाही होत आहे. पुण्यातील एक बोलका व्हिडीओ व्हायरल होत आहे. पुणे शहरातील कॅम्प परिसरात शाहू जलतरण तलावावर एक माकड गेल्या काही दिवसांपासून दररोज पोहण्यासाठी येत आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून या तळपत्या उन्हात थंडावा मिळवण्यासाठी हे माकड या ठिकाणी दररोज न चुकता येतं. हे माकड काही वेळ पोहून परत झाडावर जाऊन बसतं. माकडाच्या या लीला पाहण्यासाठी या जलतरण तलावावर माणसांची मात्र गर्दी होत आहे. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा























