एक्स्प्लोर
ओलाच्या मुंबई-पुणे प्रवासाचे बिल तब्बल 83 हजार रुपये
मुंबई: मुंबईच्या एका उद्योजकाला मुंबईहून पुण्याला जाणे अतिशय महाग पडले. कारण या प्रवासाचे बिल त्यांना चक्क 83,395 रुपये देण्यात आले होते. कमल भाटिया असे या उद्योजकाचे नाव असून 4 सप्टेंबर रोजी एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी त्यांनी ओलाच्या टॅक्सी सेवेचा वापर केला होता.
त्यांना दिलेल्या या बिलात ताशी 50 किलोमीटर वेगाने भाटिया यांनी 14 तासांचा हा प्रवास केल्याचे नमुद केले होते. भाटिया यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन मुलीही होत्या. ओला अॅपच्या फ्लीट ऑपरेटर सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना भले मोठे बिल आल्याचे सांगण्यात येत असून ओलाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
आधिक माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजीच्या मुंबई-पुणे प्रवासात भाटिया यांना कॅब चालक राकेशने 83 हजार 339 रुपयांचे बिल दिले, ते पाहून भाटियांना धक्का बसला. यानंतर बिलातील रकमेवरून त्यांचा आणि कॅब चालक यांच्यामध्ये वादही झाला. जवळपास 30 मिनीट वादानंतर कॅब चालकाने आपली चूक मान्य केली.
राकेशने कमल भाटिया यांना दिलेल्या बिलात त्यांनी 14 तास 36 सेकंदामध्ये 7092 किलोमीटरचा प्रवास केल्याचे नमुद केले होते. यातील 2750 रुपये 250 किलोमीटरसाठी चार्ज करण्यात आले होते. तर उर्वरित अंतरासाठी त्यांना 75,092 रुपये द्यायचे होते. तसेच या प्रवासासाठी त्यांना 5,382 रुपयांचा कर लावण्यात आला होता.
''मुंबई-पुणेदरम्यानचा प्रवासाचा हा अनुभव अतिशय धक्कादायक होता. कारण, जर मी मुंबई ते पुणे प्रवास विमानाने केला, तरी इतके बिल द्यावे लागत नाही. याशिवाय कोणतीही गाडी 14 तासात सात हजार अंतर कापू शकत नाही,'' असे कमल भाटियांचे मत होते. शेवटी कमल यांना 347 किलोमीटरसाठी 4088 रुपये द्यावे लागले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement