एक्स्प्लोर
भाजपच्या माजी नगरसेवकाच्या गाडीत 10 लाखाच्या जुन्या नोटा सापडल्या
पुणे: पुण्यातील सासवडमध्ये 10 लाखांच्या जुन्या नोटा इनोव्हा गाडीत सापडल्या आहेत. ही गाडी भाजपच्या माजी नगरसेवकाची असल्याची माहिती समजते आहे. काल रात्री ही कार ताब्यात घेण्यात आली आहे.
भाजपचे माजी नगरसेवक उज्वल केसकर आणि युवक आघाडीचे पदाधिकारी दीपक पोटे हे कार घेऊन बारामतीला जात असताना सासवड पोलिसांनी ही कारवाई केली. पण हे पैसे आपण बँकेत भरण्यासाठी जात असल्याचं त्यांनी पोलिसांनां सांगितलं.
दरम्यान, बारामती नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या नोटांचा संबंध त्या निवडणुकीशी आहे का? याचाही पोलीस तपास करीत आहेत. तसेच या नोटांसंबंधी माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement