(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress New President: काँग्रेसला कधी मिळणार नवा अध्यक्ष, काय आहे निवडणुकीचा कार्यक्रम? वाचा संपूर्ण माहिती
Congress New President: काँग्रेसच्या सर्वोच्च पदासाठी निवडणूक लढवण्यास राहुल गांधी इच्छित नसल्याचं सांगण्यात येत आहे.
Congress New President: काँग्रेस (Congress) पक्षाच्या नवीन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया रविवारी सुरू झाली. तसेच पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने म्हटले आहे की, ते 20 सप्टेंबरपर्यंत नवीन पक्षाध्यक्ष निवडण्याच्या वेळापत्रक प्रमाणे काम करतील. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री (Madhusudun Mistry) म्हणाले की, पक्षाध्यक्ष निवडीची अंतिम तारीख 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान कोणत्याही दिवशी असू शकते. हे काँग्रेस कार्यकारिणी (CWC) वर अवलंबून आहे.
काँग्रेसच्या सर्वोच्च पदासाठी निवडणूक लढवण्यास राहुल गांधी इच्छित नसल्याचं सांगण्यात येत आहे. CWC ने निर्णय घेतला होता की 16 एप्रिल ते 31 मे 2022 पर्यंत ब्लॉक कमिटी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (PCC) प्रत्येकी एका सदस्यासाठी निवडणुका घेण्यात येतील. 1 जून ते 20 जुलै या कालावधीत जिल्हा समिती अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवडणूक, 21 जुलै ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत पीसीसी प्रमुख आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) सदस्यांची निवड आणि AICC अध्यक्षांची निवड 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान होणार.
काँग्रेसला नवा अध्यक्ष कधी मिळणार?
काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे म्हणणे आहे की, 20 सप्टेंबरपर्यंत काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल. दरम्यान, G-23 गटाचे नेते निवडणूक प्रक्रिया आणि पारदर्शकतेवर लक्ष ठेवून असल्याचे बोलले जात आहे . गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर सिंग हुड्डा आणि मनीष तिवारी यांच्यासह G-23 चे नेते CWC ते ब्लॉक स्तरापर्यंत निवडणुका योग्यरित्या आयोजित करण्यासाठी आग्रही आहेत.
निवडणुकीचे वेळापत्रक काय आहे?
काँग्रेस नेते मिस्त्री म्हणाले, "आम्ही निवडणुकीचे वेळापत्रकानुसार काम करत राहू. आम्ही आधीच निवडणुकीचे वेळापत्रक पक्ष नेतृत्वाकडे पाठवले आहे आणि सीडब्ल्यूसीच्या मंजुरीची वाट पाहत आहोत. जी काँग्रेस अध्यक्ष निवडीची अंतिम तारीख ठरवेल,” ब्लॉक, जिल्हा आणि राज्य पातळीवर काँग्रेस समित्यांच्या संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, निवडणूक प्राधिकरण एआयसीसी प्रतिनिधींची निवड अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे. हे प्रतिनिधी पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी महत्त्वाच्या निवडणुकीत मतदान करतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
जामनगरमध्ये प्राणीसंग्रहालय निर्मितीचा मार्ग मोकळा, रिलायन्सच्या प्राणीसंग्रहालयाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
CJI NV Ramana : देशात झपाट्याने वाढणारे शिक्षणाचे कारखाने, आंध्र प्रदेशला निधी देण्यास केंद्राकडून विलंब, भारताच्या सरन्यायाधीशांकडून चिंता व्यक्त