Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिल्लीत सरकारी गाडी मिळेना, भाडेतत्वावरील गाडीने प्रवास करण्याची वेळ
Vijay Wadettiwar : भाडेतत्वावरील गाडी पाठवण्यात आल्याने विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज न्यायाधीशांच्या नियोजीत दौऱ्यासाठी गाड्या देण्यात आल्या आहेत.
Vijay Wadettiwar, दिल्ली : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टवार यांना दिल्लीत सरकारी गाडी नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांना भाडेतत्वावरील गाडीने प्रवास करावा लागलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना घ्यायला महाराष्ट्र सदन प्रशासनाने भाडेतत्वावरील गाडी पाठवली होती. राजशिष्टचारामधे मुख्यमंत्री यांच्या खालोखाल विरोधी पक्षनेते हे पद येत, मात्र आज त्यांनाच सरकारी गाडी मिळाली नाही.
दरम्यान, भाडेतत्वावरील गाडी पाठवण्यात आल्याने विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज न्यायाधीशांच्या नियोजीत दौऱ्यासाठी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळं गाडी देता आली नसल्याचं सदन प्रशासनाने सांगितले आहे.
विजय वडेट्टीवार काय काय म्हणाले?
विजय वडेट्टीवार म्हणाले, आज वरिष्ठ नेत्यांसोबत मी भेटी घेतल्या. राज्यातील परिस्थिती बाबत चर्चा केली, काही माहिती दिली. आघाडीबाबत चर्चा वरिष्ठ नेत्यांसोबत केली. 23 सप्टेंबरला आमच्या चंद्रपूर जिल्ह्याची बैठक आहे. मतदार संघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. त्यावर काही चर्चा झाली नाही. तो प्रकार गैरसमजातून निर्माण झाला होता त्यावर आम्ही आता पडदा टाकला आहे.
2013 च्या पाशा पटेल आणि फडणवीस यांच्या क्लिप काढून बघा. अदानी समूहाने 1 लाख 38 हजार टन तेल आयात केलं आहे. आता तुम्ही निर्यात दर कमी करण्याचा निर्णय घेता, हा शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा जुमाला आहे. राज्यात कुठे कांदा आहे ? तेव्हा असा निर्णय घेता. अशी ही बनवाबनवी हा नवा उद्योग राज्य आणि केंद्र सरकार करत आहे.
सर्व्हे सांगत आहेत की भाजप 55-60 च्या पुढे जात नाहीत. हे इजा बिजा तिजा महाराष्ट्राला लुटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात कमिशन खाणारे हे भाजपचे लोक आहेत. 32 कोटी कोणी खाल्ले याचा शोध घेण्याची, चौकशी करण्याची गरज आहे. हे कमीशन खोर, डाकू, लुटारू यांचं सरकार आहे. लुटारूंची टोळी या राज्यावर बसली आहे. केंद्रीय कृषिमंत्री तेलंगणा आणि आंध्रमध्ये जाऊन तिथे पॅकेज जाहीर करता. महाराष्ट्रात नुकसान झाल नव्हत का ? असा सवालही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले