एक्स्प्लोर

Sanjay Raut: राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....

Sanjay Raut on Opration Lotus: भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस' राबवले जाणार? का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. याबाबात आज माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता भाजप महाविकासआघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेतील दारुण पराभवानंतर मविआतील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. लवकरच  महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन लोटस' राबवले जाणार? का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. याबाबात आज माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 

विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, असं कळतं भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष अशी कोणतीही ऑपरेशन्स करू शकतो. त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणे ते करू शकतात. याआधी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे किंवा अजित पवार यांच्यासारखे लोक का त्यांच्यासोबत गेले? ते देखील भीतीपोटीच भाजपसोबत गेले, ते काय ऑपरेशन लोटस होतं का नाही. ते तर ऑपरेशन डर होतं. पळून घाबरून गेले ते. भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावर सर्व खटले मागे घ्यायचे. तुमची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार मला भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये दिसत नाही असं संजय राऊत यांनी लगावला आहे.

सत्ताधारी सभागृह चालू देत नाही 

सत्ताधारी सभागृह चालू देत नाहीत. हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. गौतम अदाणी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या न्यायालयाच्यानुसार आम्ही अडाणी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत. आता जॉर्ज सोरेस वर सभागृह चालू देत नाहीत. भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत. विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? राज्यसभा सभापती पक्षपातीपणा करत आहेत. आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता, असंही अविश्वास ठरवाबाबत संजय राऊत म्हणालेत. 

पडळकरांच्या शरद पवारांवरील टीकेवर उत्तर

काल (मंगळवारी) माळशिरसमध्ये सभेवेळी बोलताना भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली. शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अशी विधान शोभतात का? भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं की, त्यांना ही भाषा वापरायला त्यांनी सांगितली आहे का? कोकणातील टिल्लू गब्बर सिंग अशी भाषा वापरतात. हे राज्याला शोभणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri: अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
शिवसेनेला नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaSachin Kharat :  संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याने परभणी बंदची हाकChandrashekhar Bawankule Meet Eknath Shinde एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri: अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
शिवसेनेला नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
Kurla Bus Accident: 15 सेकंदांत 70चा स्पीड, ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय अन्...; कुर्ल्यातील अपघातानं क्षणार्धात होत्याचं झालं नव्हतं
15 सेकंदांत 70चा स्पीड, ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय अन्...; कुर्ल्यातील अपघातानं क्षणार्धात होत्याचं झालं नव्हतं
Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
Embed widget