आम्ही यापूर्वीच विशेष अधिवेशन बोलवून 10 टक्के आरक्षण दिलंय, राजेंद्र राऊतांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde : आम्ही यापूर्वीच विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलंय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

Eknath Shinde on Rajendra Raut , परांडा : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी राजेंद्र राऊत यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज (दि.14) परांडा तालुक्यात सभा पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजेंद्र राऊतांच्या मागणीवर भाष्य केलं. आम्ही यापूर्वीच विशेष अधिवेशन बोलवून 10 टक्के आरक्षण दिलंय, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजेंद्र राऊतांची मागणी एकनाथ शिंदे यांनी अमान्य केल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदे म्हणाले, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. कांदा निर्यात बाबतीत फार मोठा दिलासा मिळालाय. निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतलाय. त्यामुळे निर्यात बंदी हटवल्याने आणि शुल्क कमी केल्याने आम्ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारचे मोदींचे धन्यवाद व्यक्त करतो. इथल्या मालाला चांगला भाव मिळेल.
बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करा, पैसा कमी पडू देणार नाही
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उजनीतून कोळेगाव पाणी सोडण्यासाठी बैठक पंधरा दिवसात देतो. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी जे निधी लागेल ते एकनाथ शिंदे देईल. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करा, पैसा कमी पडू देणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. माझ्यावर किती आरोप केलं पण मी आरोपतून उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर देतो लोकं CM म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणतात पण मी CM म्हणजे कॉमन मॅन मानतो
धाराशिव येथे मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडवले
परांडा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आदोलकांनी अडवले होते. यावेळी आंदोलकांनी हैद्राबाद गॅजेट लागू करण्याची आणि आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मिटविण्याची मागणी केली आहे. धाराशिव शहरातील हातालाई मंगल कार्यालय येथे आले पक्षमेळाव्यासाठी आले असता त्यांना अडवण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेही आंदोलकासोबत चर्चा करण्यासाठी थांबले. 5 मिनिटं वेळ देत त्यांनी आंदोलकाचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले.
इतर महत्वाच्या बातम्या
























