Kurla Bus Accident: 15 सेकंदांत 70चा स्पीड, ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय अन्...; कुर्ल्यातील अपघातानं क्षणार्धात होत्याचं झालं नव्हतं
Kurla Bus Accident: घटनेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. अरुंद रस्ता आणि त्यातच दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
मुंबई: कुर्ला परिसरात सोमवारी रात्री क्षणार्धात होत्याचे नव्हतं झालं. कुर्ला डेपोतून आलेल्या इलेक्ट्रिक बस चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सीलेटरवरती पाय पडला. गाडीने एकदम 70 चा स्पीड घेतला आणि समोर येईल त्यांला उडवलं. या घटनेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. अरुंद रस्ता आणि त्यातच दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.(Kurla Bus Accident)
या दुर्घटनेबाबत पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बस डेपोतून बाहेर आल्यानंतर पहिल्याच स्पीड ब्रेकवर चालक संजय मोरे याचा ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडला आणि गाडीने एकदम 60 ते 70 चा स्पीड घेतला. वाहकाने बस थांबविण्यासाठी घंटीही वाजवली, मात्र मोरेच बसवरील नियंत्रण सुटल्यामुळं बस थांबवणंं शक्य झालं नाही. भाजी मार्केटच्या बस थांब्याकडून समोर येणाऱ्यांना वाचवण्यासाठी मोरेने दुसऱ्या वाहनांसह माणसांना चिरडलं. वाऱ्याच्या वेगाने दोनशे ते अडीशे मीटर अंतरानंतर बस बस आंबेडकर नगरच्या कमानीला धडकली. अवघ्या काही क्षणात वाहनाखाली, तसेच धडकेत जवळपास 50 जण जखमी होत सात जणांचा बळी गेला, तर काही जणांवर उपचार सुरू आहे. या अपघातात चार पोलिसही जखमी झाले आहेत.(Kurla Bus Accident)
बसच्या काचा फोडून प्रवाशांना काढलं बाहेर
अपघातग्रस्त बसमध्ये जवळपास 60 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर बसमधील प्रवासी चांगलेच घाबरले. प्रवाशांनी आरडा-ओरड केली. संपूर्ण परिसर आवाजांनी हादरला. समोर सुरू असलेल्या मृत्यूच्या थरारक प्रवासाने प्रवाशांकडून बस थांबवण्यासाठी धडपड सुरू होती. बस आंबेडकर कमानीला धडकताच बसचा दरवाजा लॉक झाला. तेव्हा मोरेनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.(Kurla Bus Accident)
नेमकं काय घडलं?
कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 10.45 च्या सुमारास भीषण अपघात झाला. बेस्टच्या 332 क्रमांकाच्या बसने नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक वाहने आणि अनेक लोकांना चिरडले. या घटनेत बेस्ट बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी बस चालकाने ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे म्हटलं आहे.(Kurla Bus Accident)
सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये जवळपास 50 जण जखमी झाले. 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बसवरील नियंत्रण सुटलेल्या बसने अनेक रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांनाही धडक दिली. या भीषण अपघाताबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तर अपघातास कारणीभूत ठरलेला बेस्टचा कंत्राटी चालक संजय मोरे याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपघाताच्या चौकशीसाठी बेस्ट उपक्रमाने मुख्य व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे.
चालक संजय मोरे हा कंत्राटी कामगार आहे. मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचे केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर 1 डिसेंबरपासून त्याला ही बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अनुभव नसल्यामुळेच त्याचा पाय ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पडला आणि अनर्थ घडला. तसेच मोरे नशेत नव्हता, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे