Ratnagiri: अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
समुद्रकिनारी मौजमजा करण्यासाठी जाणार असाल तर नागरिकांनी अधिक सावधानतेनं रहाणं गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय.
Ratnagiri: राज्यात सध्या गुलाबी थंडीमुळं घरोघरी बाहेर फिरायला जायचे बेत सुरु आहेत. सुट्ट्या टाकून कोकणात समुद्रकिनारी मौजमजा करण्याचा विचार करत असाल तर सावधान! मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरीच्या भाटये समुद्रकिनारी अजस्त्र लाटांची मौज लुटण्यासाठी गेलेल्या दाम्पत्य मासेमारीसाठी किनाऱ्यावर थांबलं होतं. पण लाटांचा वाढलेला वेग आणि बाहेर पडण्याचा मार्ग न कळल्यानं ते लाटांमध्येच अडकले. या थरारक घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात आली. रत्नागिरीजवळच्या भाटये बीचवर ही थरारक घटना घडली. या घटनेचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
नक्की घडले काय?
भाटये बीचवर डोंगर रांगा आणि लाटा यांचा सुंदर खेळ पाहण्यासाठी आलेले हे दाम्पत्य समुद्राच्या किनाऱ्यावर चालले होते. अचानक समुद्राच्या अजस्त्र लाटांनी त्यांना गाठले. त्यांचे पाय सुटले आणि ते लाटांमध्ये अडकले. समुद्राच्या प्रचंड लाटा त्यांना खेचत घेत होत्या. या लाटांमधून बाहेर न पडता आल्यानं समुद्राच्या लाटांमध्ये हे दाम्पत्य अडकलं. त्याच वेळी, आसपास मच्छीमारी करणारे बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या दोघांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली. समुद्राच्या लाटांमध्ये फसलेल्या दांपत्याचा त्यांने प्रचंड धाडस दाखवत मदतीसाठी पुढे येऊन ताब्यात घेतले. काही वेळातच पोलिसांसह त्यांची सुटका करण्यात आली. मच्छीमारी करणारे बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये ठरले दाम्पत्यासाठी देवदूतच ठरले.
कोकणात जात असाल तर सावधान!
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि यामुळे समुद्रकिनारी मौजमजा करण्यासाठी जाणार असाल तर नागरिकांनी अधिक सावधानतेनं रहाणं गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय. समुद्राच्या लाटांच्या ताकदीसमोर जास्त विचार न करता आत प्रवेश करणं किती जीवघेणं ठरू शकतं हे यातून समोर आलं आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दाम्पत्याची सुटका केली.दोघांपैकी कुणालाही जीवितहानी झाली नाही.