(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिल्कीस बानो प्रकरणी 27 तारखेला आंदोलन छेडणार, विद्या चव्हाण यांचा इशारा
Bilkis Bano Case: बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आलंय. या विरोधात राष्ट्रवादीतर्फे येत्या 27 तारखेला आंदोलन छेडणार असल्याचे राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सांगितलं आहे.
Bilkis Bano Case: बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आलंय, नुसतंच सोडलं नाही तर त्यांना हार घालत मिठाई भरवण्यात आली. प्रत्येक स्रीचा धर्म हे तिचं चारित्र्य आहे. त्यावर जर कुणी हल्ला केला तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणाला हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आम्ही विरोध करू, असे सांगत राष्ट्रवादीतर्फे येत्या 27 तारखेला या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सांगितलं आहे. विद्या चव्हाण आज कल्याण मध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांचे संवाद साधला
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण आज कल्याण मध्ये आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या कल्याण जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना त्यांनी महागाई विरोधात होणाऱ्या आंदोलनासह येत्या 27 तारखेला बिल्कीस बानो प्रकरणातील आंदोलनसंदर्भात माहिती दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाल्या की, देशात महागाई प्रचंड वाढली आहे, 2013-14 साली नरेंद्र मोदी, स्मृती इराणी यांनी देशभरात महागाई विरोधात आंदोलन छेडलं होतं. प्रकाश जावडेकरांनी तर आमचं सरकार आल्यास डिझेल तीस रुपये तर पेट्रोल पस्तीस रुपये करू, असं आश्वासन देखील दिलं होतं. मात्र आत्ता त्यांचं सरकार असताना 410 रुपयांचा सिलेंडर अकराशे रुपयांना झाला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढली.आज देशात 40 ते 50 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. या महागाई विरोधात पावसाळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले, असल्याचे माहिती विद्या चव्हाण यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना चव्हाण यांनी बिल्कीस बानो प्रकरणात भाजप सरकारला लक्ष्य केलं. बेरोजगारी महागाई सारख्या प्रश्नांना बाजूला सारत भाजप इतर प्रश्नावर बोलते. बिल्कीस बानो प्रकरणातील 11 गुन्हेगारांना सोडण्यात आले. नुसते सोडलं नाही तर त्यांना मिठाई भरवली.त्यांना हार घातले. हे अत्यंत दुर्दैवी आहे. बिल्कीस बानो ही मुस्लिम असली तरी ती आमची बहीण आहे. प्रत्येक स्त्रीचा धर्म हे तिचा चारित्र्य आहे. त्यावर जर कोणी हल्ला केला तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणीही असो. कोणालाही हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. येत्या 27 तारखेला या विरोधता आम्ही आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
त्या म्हणाल्या की, अनेक गोष्टी पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाही. परंतु त्या होताना दिसतायत याच प्रमुख कारण म्हणजे राजकीय पक्ष निर्ढावलेला आहेत. 50 कोटींची लाच घेऊन आमदार आसामला गेले, ते आपण सर्वांनी बघितलं. सर्वसामान्य माणूस महागाई बेरोजगरीशी दोन हात करणं कंठीन झालं आहे. त्यांना देखील याचं आश्चर्य वाटतंय. काय झाडी, काय डोंगर ,काय हॉटेल या माणसाचं मोठेपण झाला की, त्याला असं वाटायला लागलंय की त्याने फारच पराक्रम केला. मात्र हा पराक्रम नाही, असा टोला चव्हाण यांनी शहाजी पाटील यांना नाव न घेता लगावला. तुमच्या मतदार संघातील लोकांवर प्रश्न सोडवत नाहीत. तुम्ही आसामला जाऊन राहतात. लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांच्या सारख्या चांगल्या मुख्यमंत्र्यांना सत्तेतून उतरवण्यासाठी जी काही 50 कोटींची लाच घेतली. पक्षाशी गद्दारी केली. त्याच्याविरोधात रोष विधानभवनात पाहायला मिळतोय. ते ही जनता निश्चित लक्षात ठेवणार, असं त्या म्हणाल्या.