जागावाटपात एकनाथ शिंदेंनी मन मोठं करुन त्याग करावा, चंद्रशेखर बावनकुळेंची अपेक्षा
एकनाथजींनी मोठं मन करून थोडा त्याग केला पाहिजे, थोडा आम्ही करून युती टिकवली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
नागपूर : "एकनाथजींनी मोठं मन करून थोडा त्याग करावा", असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही म्हटलंय. त्यांनी थोडा त्याग करावा, आम्ही थोडा करून युती टिकवली पाहिजे असं ते म्हणाले. आमचा पक्ष मोठा असल्याने हिस्सा मोठा मिळावा असा आमचा आग्रह असतो असंही ते म्हणाले. तसंच आम्ही जिंकतो ती जागा आम्ही लढवली पाहिजे असा आग्रह असतो असं बावनकुळे म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंशी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह संवाद साधला.
जागावाटपात एकनाथ शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपने त्याग केल्याची अमित शाहांनी आठवण करुन दिली. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अमित भाई आणि शिंदेंच्या काय बोलले हे मला माहिती नाही. मात्र हे खरं आहे की मुख्यमंत्रीपद हे राज्याचं मुख्य असतं, ते सरकारचा चेहरा आहे. आमचा एकनाथजींना आग्रह असतो की आमचा पक्ष मोठा आहे त्यामुळे आम्हाला हिस्सा थोडा जास्त मिळाला पाहिजे. कुणाचा त्याग किती याचा मीटर लावता येत नाही. एकनाथजींनी मोठं मन करून थोडा त्याग केला पाहिजे, थोडा आम्ही करून युती टिकवली पाहिजे. त्यांना असं वाटतं की ते मुख्यमंत्री आहेत, त्यांची जास्त माणसं लढली पाहिजे... ते सगळ्यांनाच वाटतं. मात्र युतीत ताणतणाव ठेवून निवडणुकांना सामोरे जाता येत नाही. ज्याठिकाणी आम्ही जिंकतो ती आम्हीच लढली पाहिजे असा आग्रह आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शाहांनी शिंदेंना काय मागितलं?
भाजपचे 106 आमदार असतानाही 40 आमदारासोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं.अर्थात त्यामागे प्रचंड थरारक अशा राजकीय घडामोडी होत्या. मात्र, जास्त आमदार असूनही देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदावर बसावं लागलं. आता भाजपने याच त्यागाचा हिशेब शिंदेंकडे मागायला सुरूवात केली का? अशी चर्चा रंगलीय. कारण जागावाटपाच्या बैठकीत अमित शाहांनी शिंदेंना उद्देशून काही वक्तव्य केली आहे.
मुख्यमंत्रिपद, शिंदे आणि हिशेबाचे धागे?
शिंदेजी या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती कामं पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे, जागावाटपात शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं, असे अमित शाह म्हणाले.
आज महायुतीची पत्रकार परिषद
महायुतीतील एका बड्या नेत्याने एबीपी माझाला ही माहिती दिलीय. मात्र, आता जागावाटपाच्या या वाटाघाटीत शिंदे काय करणार? मविआचं जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेकडून जास्त जागांवर दावा करण्यात आला आहे. 115 जागांवर निरीक्षक नेमकले होते. वाटाघाटी सुरु झाल्या तेव्हा 90 ते 100 मागणी केली होती. राज्यातल्या महायुती सरकारची आज सकाळी 11.30 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर ही पत्रकार परिषद होत असून या पत्रकार परिषदेतून कोणती माहिती दिली जाणार? याकडे लक्ष असेल. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक लक्षात घेता महायुतीकडून शासन निर्णयांचा धडाकाच लावला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलणार? की विरोधकांना टार्गेट करणार? याची उत्सुकता आहे.
Chandrashekhar Bawankule Nagpur : युतीत ताणतणाव ठेऊन निवडणुकांंना सामोरं जाता येत नाही : बावनकुळे
हे ही वाचा :
मुख्यमंत्रिपद देताना आम्ही त्याग केला, जागावाटपात तुम्ही झुकतं माप द्यावं; अमित शाहांचा शिंदेंना आग्रह, सूत्रांची माहिती