Zero Hour : जागावाटपाच्या चर्चेत शाहांचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर दबावतंत्र?
Zero Hour : जागावाटपाच्या चर्चेत शाहांचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर दबावतंत्र?
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं, असं अमित शाह यांनी शिंदेंना सुचवल्याचं कळतं. अमित शाहांंचं हे वक्तव्य म्हणजे शिंदेंनी तिढा असलेल्या काही जागा भाजपसाठी सोडाव्यात यासाठी आवाहन होतं, की दबावतंत्र होतं यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. महायुतीत जागावाटपाची सर्वात मोठी संभाव्य अडचण म्हणजे तिन्ही घटक पक्षांना समाधान वाटेल इतक्या जागा प्रत्येक पक्षाला मिळणं. कारण २०१९ साली युतीत शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष होते. त्यावेळी भाजपनं १६४ मतदारसंघात उमेदवार दिले होते, तर तेव्हा एकसंध शिवसेनेनं १२४ जागा लढवल्या होत्या. यंदा महायुतीत दोनऐवजी तीन पक्ष आहेत. त्यामुळं प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागांची संख्या कमी होणार, हे निश्चित आहे. आणि तेच सर्वाधिक अडचणीचं आहे. सीटिंग म्हणजे विद्यमान आमदारांच्या जागा मागायच्या नाहीत हे जागावाटपाचं मुख्य सूत्र असलं, तरी पराभूत जागांचं वाटप कसं करायचं, यावर येऊन घोडं अडतं. आता अमित शाहांचा इशारा किंवा त्यांची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती गांभीर्यानं घेतात? तसंच लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधासभा निवडणुकीसाठीही महायुतीच्या जागावाटपाला उशीर होतो की जागावाटपाची घोषणा वेळेत होते, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. -----------