(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वंचितने प्रणिती शिंदेंना डिवचलं, भाजप प्रवेशाचा मुहूर्त विचारला, दक्षिण आफ्रिकेतील मालमत्तेच्या उल्लेखाने खळबळ
VBA on Praniti Shinde : गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aagadhi) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) जागावाटपावरुन संघर्ष सुरुच आहे.
VBA on Praniti Shinde : गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aagadhi) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) जागावाटपावरुन संघर्ष सुरुच आहे. वंचितचा समावेश (Vanchit Bahujan Aagadhi) महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) आली असली तरीही जागावाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, आता वंचितने काँग्रेस नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. वंचित बहुजन आघाडीने ट्वीटरच्या माध्यमातून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आली आहे.
वंचितने ट्वीटमध्ये काय म्हटलंय?
"ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित - बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?", असा सवालही वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे Praniti Shinde यांना केला आहे.
वंचितकडून प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच
वंचित बहुजन आघाडीने ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये प्रणिती शिंदे यांच्या फोटोमागे मागे भाजपचे कमळ लावण्यात आले आहे. प्रणिती शिंदे भाजपमध्ये कधी पक्ष करणार आहात? असा सवालही ट्वीटरवरुन वंचितने केला आहे.
ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 18, 2024
आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही.
आम्ही महाराष्ट्रातील वंचित - बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो.
असो, या सर्व गोष्टी… pic.twitter.com/vifYxfMQ2Q
प्रणिती शिंदेंना सोलापुरातून उमेदवारी?
महाविकास आघाडीत सोलापुरची जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल असे बोलले जात आहे. एकीकडे राज्यात जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असतानाच वंचित काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सोलापुरात काँग्रेसकडून प्रणिती शिंदे Praniti Shinde यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. सोलापुरात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज यांनी मोठा विजय मिळवला होता. दरम्यान, या मतदारसंघातील प्रणिती शिंदेंचे काम पाहता त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या