एक्स्प्लोर

Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....

Eknath Shinde Thane residence: एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिवतारे श्रीकांत शिंदेंना भेटून माघारी

ठाणे: राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे हे सोमवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या बंगल्यावर गेले होते. यावेळी पोलिसांनी विजय शिवतारे Vijay Shivtare) यांना न ओळखल्यामुळे त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. त्यामुळे विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच संतापले. 

प्राथमिक माहितीनुसार, विजय शिवतारे  एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या गेटमधून आतमध्ये शिरत असताना त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली. पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. तुम्ही कोण, थांबा, असे पोलिसांनी म्हटले. त्यामुळे विजय शिवतारे हे चांगलेच वैतागले आणि त्यांनी पोलिसांना सुनावले. आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का तुम्हाला ? बरोबर नाही, असे प्रत्येक वेळेस करतात तुम्ही, किती वर्षे झाले काम करत आहात?, अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदेंच्या बंगल्याच्या गेटमधून आत सोडण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन दिवस एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. ताप असल्यामुळे ते दरेगावला होते आणि काल दुपारी ते मुंबईत आले मी औरंगाबादला होतो त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी आलो. डॉक्टरांकडून त्यांच्या चाचण्या होत आहेत. मी त्यांना न भेटता श्रीकांत शिंदे यांना भेटून निघालो आहे. बैठकीची मला कल्पना नाही,  आमच्या कुठल्याही आमदारांची बैठक नव्हती. सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांचे आहेत आणि ते ठरवतील ते शंभर टक्के सर्वांना मान्य आहे. आम्ही कोणी त्या प्रोसेसमध्ये नाही, सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. ते जे निर्णय घेतील तो सगळ्या  आमदारांना मान्य असेल, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.

विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. त्यामुळे शिवतारेंनी बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात दंड थोपटले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर विजय शिवतारे यांनी बंडाची तलवार म्यान केली होती. 

विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंचा विजय

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी 24,188 इतक्या मताधिक्याने विजय मिळवला होता. पुरंदर विधानसभा मतदारसंघात त्यांच्यासमोर काँग्रेसचे संजय जगताप आणि संभाजी झेंडे यांचे आव्हान होते. मात्र, विजय शिवतारे यांनी पुरंदरचा आपला गड राखला होता. 

देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर नेत्यांची गर्दी

राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी 5 नोव्हेंबरला होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी भाजपचे अनेक नेते दाखल झाले. मंत्रीपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. यामध्ये माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, अतुल सावे, प्रतापराव चिखलीकर ,चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा समावेश आहे. 

आणखी वाचा

एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द, शपथविधीपूर्वी बोलावलेली आमदारांची आजची बैठकही स्थगित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget