(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pravin Darekar Azad Maidan : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रविण दरेकर आझाद मैदानावर
Pravin Darekar Azad Maidan : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रविण दरेकर आझाद मैदानावर
हेही वाचा :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मोठे इनकमिंग झाल्याचे दिसून आले होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महायुतीला एकामागे एक धक्के दिले होते. मात्र विधानसभेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी सोनेरी काळ सुरु झाल्याचे दिसून येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीगोंद्यातील माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. या पाठोपाठ आता अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena UBT) बडा नेता गळाला लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.