(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shrikant Shinde on DCM : उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा निराधार , श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण
Shrikant Shinde on DCM : उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा निराधार , श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण
हेही वाचा :
राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे हे सोमवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या बंगल्यावर गेले होते. यावेळी पोलिसांनी विजय शिवतारे Vijay Shivtare) यांना न ओळखल्यामुळे त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. त्यामुळे विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच संतापले.
प्राथमिक माहितीनुसार, विजय शिवतारे एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या गेटमधून आतमध्ये शिरत असताना त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली. पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. तुम्ही कोण, थांबा, असे पोलिसांनी म्हटले. त्यामुळे विजय शिवतारे हे चांगलेच वैतागले आणि त्यांनी पोलिसांना सुनावले. आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का तुम्हाला ? बरोबर नाही, असे प्रत्येक वेळेस करतात तुम्ही, किती वर्षे झाले काम करत आहात?, अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदेंच्या बंगल्याच्या गेटमधून आत सोडण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोन दिवस एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. ताप असल्यामुळे ते दरेगावला होते आणि काल दुपारी ते मुंबईत आले मी औरंगाबादला होतो त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी आलो. डॉक्टरांकडून त्यांच्या चाचण्या होत आहेत. मी त्यांना न भेटता श्रीकांत शिंदे यांना भेटून निघालो आहे. बैठकीची मला कल्पना नाही, आमच्या कुठल्याही आमदारांची बैठक नव्हती. सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांचे आहेत आणि ते ठरवतील ते शंभर टक्के सर्वांना मान्य आहे. आम्ही कोणी त्या प्रोसेसमध्ये नाही, सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. ते जे निर्णय घेतील तो सगळ्या आमदारांना मान्य असेल, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.