एक्स्प्लोर

किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ

Asaduddin Owaisi on Maulana Sajjad Nomani : ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान 'व्होट जिहाद'बाबत विधान केले होते.

मालेगाव : ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी (Maulana Sajjad Nomani) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) दरम्यान 'व्होट जिहाद'बाबत (Vote Jihad) विधान केले होते. त्यांच्या युट्यूबवरील एका व्हिडीओत त्यांनी व्होट जिहाद या शब्दाचा उल्लेख केला होता. तसेच नोमानी यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची स्तुती केली होती. भाजपला (BJP) मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाका. भाजपला मतदान करू नका. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) साथ द्या, असेही त्यांनी म्हणाले होते. त्यानंतर भाजपने व्होट जिहादच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला होता. आता एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी  सज्जाद नोमानी यांच्यावर मालेगावातून बोलताना जोरदार हल्लाबोल केला. 

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, भाजपने महाराष्ट्रात प्रचार केला की, फतवा जितेगा या भगवा जितेगा आणि आमचे निवडून येणारे सीट पडले. सांगा कोण आहेत हे लोक? निवडणूक काळात काही लोक येतात आणि सांगतात याला मते द्या, त्याला मते द्या. अरे तुम्ही निवडणूक लढू शकत नाही तर तुमच्या जावयाला निवडणुका लढवायला सांगा. आम्ही यांना सांगू आम्ही त्यांना सांगू, शेवटी काय झालं? भाजपला तुम्ही भांडवल दिले, असे म्हणत त्यांनी नोमानी यांच्यावर टीका केली.

पाकीट घेऊन जीवन जगणाऱ्यांनो तुम्ही डूबून मरा

ते पुढे म्हणाले की, धर्माचे काम करता येत नाही तर नका करू. किमान प्रार्थना करा. सगळं आम्हालाच पाहिजे म्हणणारे आज कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही. इम्तियाज जलील यांना मत देऊ नका, समाजवादी पार्टीला मत द्या, असे सांगणारे लोक कुठे गेलेत? पाकीट घेऊन जीवन जगणाऱ्यांनो तुम्ही डूबून मरा, असा टोला त्युंनी नोमाणी यांना लगावला. 

महाराष्ट्रातील मुस्लिमांना कमजोर करायचे कामa 

ते माझ्या घरी आले, तेव्हा मी त्यांना इंग्रजीची कुराण भेट दिली. मी खूप काही बोलू शकतो, तुम्हाला घराच्या बाहेर पडणे मुश्किल होईल. किमान कुराणची तरी लाज ठेवायला हवी होती. तुम्ही जे काम करत आहात त्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांना कमजोर करायचे काम होत आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही निवडणुका लढा, आम्ही तुमच्या सोबत राहायला तयार आहोत. किती दिवस असं करणार? याला पाठिंबा, त्याला पाठिंबा. तुम्ही पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना किती मते पडली? तेवढ्याच मतांनी आमचे उमेदवार पडले, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय. 

आपली मस्जिद आबाद ठेवा

भाजपला तुम्ही आयतं भांडवल दिलं, त्यांनी त्याचा प्रचार केला. उद्या भाजपने काही निर्णय घेतले तर त्यांना विरोध कोण करेल? मुस्लिम बांधवांनो, आपली मस्जिद आबाद ठेवा. मस्जिद कायम भरलेली ठेवा, मस्जिदमध्ये गर्दी करा. दर्गा, मस्जिद सांभाळा, कोणाला घाबरू नका, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी सांगितले. 

आणखी वाचा 

Asaduddin Owaisi : मोहन भागवत म्हणतात पोरं पैदा करा, ते काही स्कीम आणणार आहेत का? असदुद्दीन ओवेसी यांचा खोचक सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget