सरकारकडे मौजमजा करायला पैसे, पण रुग्णांच्या उपचारसाठी पैसे नाहीत; सरकारची सीबीआय चौकशी करा, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
Uddhav Thackeray) : ठाणे, नांदेड, संभाजीनगर, नागपूर येथील रुग्णालयात गेलेल्या जीवाला जबाबदार कोण? त्याची जबाबदारी कधी घेणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारनंतर सरकारची दुर्दशा झाली आहे. नांदेडच्या प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. ठाणे, नांदेड, संभाजीनगर, नागपूर येथे रुग्णालयात गेलेल्या जीवाला जबाबदार कोण? आणि जबाबदारी कधी घेणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सरकारला आहे. या सरकारकडे गुवाहटी, गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत परंतु रुग्णांवर उपचार करायला पैसे नव्हते. त्यामुळे या सरकारची नि:पक्षपातीपणे सरकारची सीबीआय चौकशी मागणी उद्धव ठाकरेंन केली आहे.
एक फुल दोन हाफ कुठे?
रोज काही विषय समोर येत आहे. काही विषय जशेच्या तसे आहेत. दसरा मेळाव्यात मी विस्ताराने बोलणार आहे. परंतु सध्या मी अस्वस्थ आहे. कारण आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत हे बघून संताप येत आहे. कोरोनाचा संकट होतं तेव्हा मविआचा सरकार होते. आरोग्य यंत्रणा तीच आहे. या आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा सामना केला. ड्रोनने सुद्धा औषध पुरवठा केला गेला होता. लसीकरण झालं, औषधांचा पुरवठा व्यवस्थित झाला. योध्यासारखे हे सगळे लढले त्या आरोग्य यंत्रणेला बदनाम केलं जाताय याला जबाबदार कोण? आता एक फुल दोन हाफ कुठे ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
नांदेडच्या डीनवरच गुन्हा का दाखल केला? (Uddhav Thackeray On Nanded Hospital Death)
राज्यात रुग्णांचे बळी जात असताना मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसलेत नक्षलवादीचा सामना कसा करायचा? याचे उत्तर शोधत आहे. हे तर मुख्यमंत्र्यांनी शोधले पाहिजे. पण फक्त नांदेडच्या डीनवरच गुन्हा का दाखल केला? कळवा, संभाजीनगरला तेच झालं तिथे गुन्हा दाखल का झाला नाही ? असा सवाल उद्धव ठकरेंनी उपस्थित केला. खासदारांनी डीनला शौचालय साफ करायला लावला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दादा तर नाराजांच्या उरावर जाऊन बसले (Uddhav Thackeray On Ajit Pawar)
अजित पवार नाराजीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत आहे. अजित पवार यांची नाराजी मी बघितली नाही. महाविकासआघाडी सरकारमध्ये असताना अजित पवार चांगले काम करत होते. ते आमच्यासोबत आहेत म्हणून ज्यांची पोटदुखी होती त्यांच्या उरावर अजित दादा बसले आहेत
औषध खरेदीमध्ये रेट कार्ड ठरलेले (Uddhav Thackeray on Medicine Scam )
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चंद्रपूरच्या रुग्णालयात औषध लिहून दिली जातात मात्र हे औषध बाहेरून आणावी लागतात मग योजनांचा फायदा कुठे होतोय का ? दुसरी साथ कुठलीही नाहीय. साथ आहे ती भ्रष्टाचाराची औषध खरेदीमध्ये रेट कार्ड ठरले आहे. जिथे जिथे औषध पुरवठा झाला नाही तिथे कोणाचे दलाल बसलेत. निविदा प्रक्रिया राबवली जात नाही.
सरकारी रुग्णालयांना भेटी द्या, डॉक्टरांना विश्वासात घ्या
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात शिवसैनिकांनी जा, तिथे वस्तुस्थिती काय आहे डीन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन समजून घ्या. सध्या हा कारभार माणुसकीला सोडून चालू आहे. मात्र अध्यक्ष काय करत आहेत? पेशंट टेबलवर आणि डॉक्टर परदेश दौऱ्यावर आहेत. मनुष्यबळ कमी होत ते आधी सुद्धा कमी आहे. मनुष्यबळाचा कारण देतात ते कोरोना काळात सुद्धा होते. यामगचे खरे कारण भ्रष्टाचार आहे. कोर्टाने राज्य सरकारला काहीतरी निर्देश द्यावेत त्यांना खडसावले पाहिजे . साथ नसताना मनुष्यबळ कसा कमी पडत . डॉक्टरांच्या बद्दलयासाठी पदासाठी रेट कार्ड ठरला आहे.