एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : ज्याला कुठली तरी खोली म्हणता ती बाळासाहेबांची खोली, नाक रगडत आलेल्या अमित शाहांनी तिथे तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार

Uddhav Thackeray Reply To Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी किमान जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी, फडणवीस म्हणजे लाज लज्जा नसलेला कोडगा माणूस अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणजे लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस, ज्याला तुम्ही कुठलीतरी खोली म्हणताय ती बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलं. 'मातोश्री'मध्ये नाक रगडत आलेले अमित शाहांनी त्यावेळी त्याच खोलीत तुम्हाला नो एन्ट्री केली होती अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंना वेड लागलं असून अमित शाहांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचा दावा करतात अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्याला उद्धव ठाकरेनी प्रत्युत्तर दिलं. 

त्याच खोलीत अमित शाहांनी तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्यासाठी बऱ्याच खोल्या असतील, त्यामध्ये तुम्ही काय करता हे आम्ही बघू इच्छीत नाही. पण तुम्ही ज्याला कुठलीतरी खोली म्हणता ती मातोश्रीमधील बाळासाहेबांची खोली आहे, ते आमच्यासाठी मंदिर आहे. त्याच खोलीत अमित शाह नाक रगडायला आले होते. त्याच खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एन्ट्री केली होती, तू बाहेर बस असं अमित शाहांनी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, गोपीनाथ मुंडे आले होते, प्रमोद महाजन आले होते. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. तिला तू नालायक माणसा, कुठलीतरी खोली म्हणतोय. कधी कुठे जाताना, चांगलं काम करताना आम्ही त्या खोलीत जाऊन बाळासाहेब, माँसाहेबांसमोर नतमस्तक होतोय.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मला भ्रमिष्ठ म्हणाले. पण मी भ्रमिष्ठ आहे की नाही ते ठरवतील. फडणवीस, जनाची नाही तरी मनाची ठेवा. हे दोन्ही तुमच्याकडे नाही ते आम्हाला माहिती आहे. लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस. 

आदित्यला मुख्यमंत्री करतो अस फडणवीस म्हणाले होते

उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की आदित्यला ग्रुम करतो, अडीच वर्षानंतर त्याला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो. मी म्हणालो, तो वयाने लहान आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी घालू नका. आमदार म्हणून त्याला काम करू द्या. आणि समजा आदित्यला मुख्यमंत्री केलात तर तुम्ही त्याच्या हाताखाली काम करणार का? त्यावर आपण दिल्लीला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आपल्याला अर्थव्यवस्थेमधील कळतं असंही ते म्हणाले होते.

तुमच्या चेल्याचपाट्यांना गावबंदी केलीय 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज तुमच्यासमोर लोकांनी रान पेटवलं आहे, तुमच्या चेल्या चपाट्यांना गावबंदी केली आहे. अशोक चव्हाणांना गावबंदी केली आहे. आता अशोक चव्हांणांना वाटत असेल की काँग्रेसमध्ये होतो तेच बरे होतं. नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला 2014 साली सांगितलं होतं की पाच वर्षांनी तुमच्या हातात या काही गोष्टी असतील. 2019 साली पुढच्या पाच वर्षात या गोष्टी असतील. आता 2047 साली सांगतात या गोष्टी असतील. तोपर्यंत कुणी असेल का? 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Embed widget