(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray: दिल्लीतून हायकमांडच्या फोननंतर कोकण, नाशिकबाबत समझोता; नाना पटोलेंसोबतच्या कम्युनिकेशन गॅपवर ठाकरेंचं भाष्य
नड्डा बोलले होते आम्हाला संघाची गरज नाही, त्यांची गरज संपली आहे असे बोलतात. आता तरी मणिपूरमध्ये पंतप्रधान जाणार आहेत की नाही? 370 काढलेल नाही पण होल्डवर ठेवलं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरून (Vidhan Parishad Election) महाविकासआघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) बिघाड झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस (Congress) ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) गटाची दोन ठिकाणी समेट झाली आहे. दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींचा फोन आला, त्यानुसार कोकण आणि नाशिकबाबत आम्ही समझोता केला आहे. महाविकास आघाडीत कोणताही बिघाड नाही,असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीवरुन आमच्यात कोणताच बिघाड झालेला नाही. संवादामध्ये लूज कनेक्शन होते. मी सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर सात - आठ दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जवळ आल्या होत्या सर्व पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले होते.काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी माझं आणि संजय राऊत यांचे बोलणं झालं. आम्ही बोलणं करून अर्ज मागे घेत आहोत. आता मला याबद्दल काही आता बोलायचं नाही.
कार्यालयात जाण्यापूर्वी मतदान करावं, उद्धव ठाकरेंचे आवाहन
मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अनिल परब यांच्या वचननामाचा अनावरण केलं.हा मतदार संघ आधीपासून आमचा आहे. सुशिक्षीत मतदारांचे प्रश्न वेगळे असतात. प्रमोद नवलकर यांनी आधी या मतदार संघांचे नेतृत्व केले आहे. आपल्या काही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, हे मतदान 26 जूनला आहे. 26 जूनला सुट्टी नाही, कार्यालयात जाण्यापूर्वी मतदान करावं, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मणिपूरमध्ये पंतप्रधान जाणार आहेत की नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल
मोहन भागवत म्हणताय मणिपूर झळतंय एक वर्षानंतर तरी ते बोलत आहे. काश्मीरमध्ये काय फरक पडलाय? जीव तर तिथे अजून जात आहेत. तीन दिवसात तीन हल्ले झाले जबाबदार कोण? मोदी तिथे जाणार नाही. मोहन भागवत जे बोलले ते मोदी मनावर घेणार का? मणिपूरच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत आता पोहोचल्या असतील. नड्डा बोलले होते आम्हाला संघाची गरज नाही, त्यांची गरज संपली आहे असे बोलतात. आता तरी मणिपूरमध्ये पंतप्रधान जाणार आहेत की नाही? 370 काढलेल नाही पण होल्डवर ठेवलं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा :
Vasant More: कोकणात जाऊन मासे न खाताच माघारी परतले! कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेच्या अभिजीत पानसेंची माघार; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं