Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
Dhananjay Munde : महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा सत्कार केला.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार विजय मिळवला आहे. महायुतीच्या विजयानंतर भाजप, शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांच्या भेटी घेत विजयाच्या शुभेच्छा देत आहेत. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते.
परळी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार करून अभिनंदन केले.
देवेंद्र फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील युतीच्या महाविजयाबद्दल अभिनंदन धनंजय मुंडे यांचं अभिनंदन केलं. 'माझ्या घरी आलात तर माझा नियम चालणार', असं फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं नाही. यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, पेट्याच कमी पडल्या ग्रेट...' असे म्हणत आधी धनंजय मुंडे यांचा सत्कार केलं. महायुतीच्या बीड जिल्ह्यातील परळीसह महाविजयाबद्दल अभिनंदन केले व पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते.
परळीतून धनंजय मुंडे दुसऱ्यांदा आमदार
परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीचे राजेसाहेब देशमुख यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. धनंजय मुंडे यांच्या विजयाचं मताधिक्य यावेळी वाढलं आहे.
धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा 140224 मतांनी पराभव केला. धनंजय मुंडे यांना 194889 मतं मिळाली. तर, राजेसाहेब देशमुख यांना 54665 मतं मिळाली. धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. मात्र, गेल्या वर्षभरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले. पंकजा मुंडे यांची साथ यावेळी मिळाली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यानं यावेळी विरोधकांचा टिकाव परळी विधानसभा मतदारसंघात लागला नाही.
इतर बातम्या :