"उदय सामंतांना उपमुख्यमंत्रिपद दिलं तर ते एक मिनिटात एकनाथ शिंदेंनाही सोडून जातील"
उदय सामंत यांना जर आज सांगितलं की उपमुख्यमंत्री पद तुम्हाला देवू तर एका मिनिटात हे एकनाथ शिंदे यांना सोडून जातील, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Sushma andhare on Uday Samant and Eknath Shinde, Pune : "उदय सामंत यांना जर आज सांगितलं की उपमुख्यमंत्री पद तुम्हाला देवू तर एका मिनिटात हे एकनाथ शिंदे यांना सोडून जातील. हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील गद्दारी करतील. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) गृहखातच काय इतर खाते देखील मिळण्याची मारामार आहे. यांना खात्याचं पडलं आहे राज्याच्या जनतेच नाही", असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या पुण्यात (Pune) बोलत होत्या.
शपथविधी जनमताने होत नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादाने
सुषमा अंधारे म्हणाल्या, आजचा शपथविधी जनमताने होत नाही तर ईव्हीएमच्या आशीर्वादाने हे सरकार आलं आहे. ईव्हीएमच्या मताच्या चोरीतून आलेलं हे सरकार आहे. हे आंदोलन राज्यभर आम्ही पोहोचवू. जनतेने देखील आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. एकनाथ शिंदे यांचे दुसरे फुगवे म्हणजे एका अर्थाने ड्रामेबाजी सुरू आहे. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रुसव्या फुग्व्याच नाटक करत आहेत.
शिंदेंना गृहखातच काय इतर खाते देखील मिळण्याची मारामार
उदय सामंत यांना जर आज सांगितलं की उपमुख्यमंत्री पद तुम्हाला देवू तर एका मिनिटात हे एकनाथ शिंदे यांना सोडून जातील. हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील गद्दारी करतील. एकनाथ शिंदेंना गृहखातच काय इतर खाते देखील मिळण्याची मारामार आहे. यांना खात्याचं पडल आहे राज्याच्या जनतेच नाही. जे जातील त्यांना लखलाभ, मला जायचं असते तर मी उन्हात का थांबले असते? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.
मारकवाडीमध्ये जे काल ग्रामस्थांनी धाडस दाखवलं ते कौतुक करण्यासारखे आहे. सोशल मीडियावर मारकडवाडीचा ट्रेंड सुरु आहे. त्या गावातील लोक म्हणतात, आमच्या गावातील राम सातपुतेंना लीड मिळूच शकत नाही. आम्हा सगळ्यांना माहिती आहे की, गावात किती एकवाक्यता आहे. राम सातपुतेंना मिळालेली मतं आमच्यावर विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. लोक सोशल मीडियावर सांगत आहेत, राज्यात निवडणुकीच्या दरम्यान पैशांचा पाऊस झालाय. लोकांनी आपली 3 ते 4 हजार रुपयांना विकली. आम्हाला आमची बदनाम करुन घ्यायची नाही, असंही अंधारे म्हणाल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या