Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत याचा खूप आनंद असून जबाबदारी देखील वाढल्याची जाणीव असल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या.
Maharashtra CM Oath Ceremony मुंबई : देवेंद्र फडणवीस यावेळी सहाव्यांदा आमदार झाले आहेत, आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत, ही खूप आनंदाची आणि जबाबदाराची गोष्ट आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. मला खूप आनंद होतोय की त्यांची मेहनत आहे त्याला यश मिळालं आहे. महायुती आता एकत्रित आहे आता पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाटचाल चालू केली आहे, याचा आनंद आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांचं जीवन एक संघर्ष राहिलेलं आहे, मी त्यांना जवळून पाहिलं आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांची जिद्द आहे, जेव्हा काय करायचं ते ठरवतात ते करुन दाखवतात, चिकाटी आणि पेशन्स खूप लागतात, त्यामुळं ते आज इथ आहेत, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. आजचा दिवस सुंदर आहे, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत याचा आनंद आहे. आम्हाला सर्वांना त्यांची साथ द्यायची आहे, त्याची जाणीव आहे, असंही त्यांनी म्हटलं.
लाडकी बहीण योजना एक चांगला प्रकल्प आहे. साऱ्या बहिणी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीसोबत जोडल्या गेल्या. संसदेत आणि राजकारणात महिलांचं प्रमाण अधिक असावं यासाठी बिल मंजूर झालं आहे, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं अमृता फडणवीस म्हणाले.
आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असते त्यावेळी अर्जुनासारख फक्त आपल्याला टारगेट दिसलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा गादी पाहिजे यासाठी यायचं नव्हतं तर महाराष्ट्रासाठी ते जे करु शकतील ते दुसरं कोणी करु शकणार नाही असा विश्वास होता. ते पुन्हा आलेले आहेत, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामाचं चीज करुन दाखवलं आहे. वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार जे पद मिळालं होतं त्याचं चीज केलं असतं. कोणतंही पद नसतं तरी त्यांनी लोकहिताचं काम केलं असतं. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय लोकहिताचा घेतील, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. प्रचार करत असताना लोक पूर्णपणे साथ देण्यासाठी उभे राहिले, याचा आनंद आहे, असंही त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांची मेहनत, दूरदृष्टी आणि व्हिजन पाहून त्यांना पुन्हा यायचं होतं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. बहिणींसाठी, शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांना पुन्हा यायचं होतं. अधिक गुंतवणूक, परकीय गुंतवणूक यातील काम पाहून ते पुन्हा येतील असं वाटलं होतं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
इतर बातम्या :