Suresh Dhas: अजय मुंडे लहान, धनंजय मुंडेंनी याला त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वत: समोर येऊन बोलावं, सुरेश धस यांचं ओपन चॅलेंज!
धनंजय मुंडे यांनी याला त्याला बोलवायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोलावं ,खोका बोका चोखा सगळे सापडतील, असं म्हणत धनंजय मुंडेंना 'ओपन चॅलेंज' दिले आहे .

Suresh Dhas ON Ajay Munde: संतोष देशमुख यांच्या मारहाणीची पाशवी दृश्य समोर आल्यानंतर राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले . राजीनाम्यानंतर आठवड्याभरात धनंजय मुंडे यांचा भाऊ अजय मुंडे मैदानात उतरले. धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) सुरेश धस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत खोक्या प्रकरणात सुरेश धसांना सहआरोपी करा म्हणत त्यांनी हल्लाबोल केला होता . दरम्यान, आज सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे . अजय मुंडेंच्या त्या आरोपांवर सुरेश धस यांनी प्रत्युत्तर देत 'अजय मुंडे अजून लहान आहे. धनंजय मुंडे यांनी याला त्याला बोलवायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोलावं ,खोका बोका चोखा सगळे सापडतील', असं म्हणत धनंजय मुंडेंना 'ओपन चॅलेंज' दिले आहे . (Suresh Dhas)
काय म्हणाले सुरेश धस?
सतिश भोसले उर्फ खोक्याला आज (12 मार्च) प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केली. खोक्या हा सुरेश धस यांचा कट्टर गुंड कार्यकर्ता आहे. त्यावर सुरेश धसांना विचारले असता, कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल.मीच म्हंटलं होतं ना कारवाई करा.त्याच्यावर कारवाई झालेली आहे, त्याच्यावर जी कलमं लागली आहे त्याद्वारे कारवाई होईल.पोलीस आता त्या कलमानुसार कारवाई करतील. दरम्यान, खोक्याप्रकरणी सुरेश धसांना सहआरोपी करा म्हणणाऱ्या अजय मुंडेंना 'तो अजून लहान आहे, त्यावर मी बोलणार नाही. धनंजय मुंडे यांना विनंती आहे, याला त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोला. खोका बोका चोखा सगळे सापडतील' असे सुरेश धस म्हणाले.
काही दिवसांपूर्वी माझ्या कट्ट्यावर झालेल्या मुलाखतीवरून अजय मुंडेंनी सुरेश धसांवर जोरदार टीका केली होती . धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या संपूर्ण आहारी गेले .धनंजय मुंडे यांच्या घरातील त्यांचे चुलत भाऊ किंवा त्यांच्या सौभाग्यवती या प्रकरणामुळे नाराज असतील .धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षांपासून नाथयाला राहायला गेले आहेत .त्या अजून आलेल्याच नाहीत .असे सुरेश धस माझा कट्ट्यावर बोलले होते .त्यावरून अजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना सुनावलं होतं .सुरेश धस यांचे सगळे आरोप बिन बुडाचे असल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे धनंजय मुंडेंची पाठराखणच केली .
अजय मुंडे काय म्हणाले होते ?
धनंजय मुंडे यांच्या आई विषयी केलेल्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धसांवर हल्लाबोल केला .ते म्हणाले होते , 'धनंजय मुंडे साहेबांची आई त्यांच्यासोबत राहत नाही हे वक्तव्य चुकीचे आहे .धस यांच्या आरोपांना अर्थ नाही . सध्या आमच्या घराचे काम सुरू आहे गावाला जाऊन राहणं गुन्हा आहे का ?मुंडे साहेब देखील तिथेच राहत होते .सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत हे माहित आहे .सुरेश धस यांना खोक्या प्रकरणात सह आरोपी केले पाहिजे ' असे अजय मुंडे म्हणाले .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

