एक्स्प्लोर

Supriya Sule on Ajit Pawar Group : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही, सुप्रिया सुळे म्हणतात, त्यात नवल ते काय?

Supriya Sule on Ajit Pawar Group : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीए सरकारमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नाही. अजितदादांच्या गटाला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आले होते.

Supriya Sule on Ajit Pawar Group : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar Group) एनडीए सरकारमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नाही. अजितदादांच्या गटाला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिला आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार रक्षा खडसे अशा 6 जणांना मंत्रिपदासाठी फोन आले आहेत. दरम्यान, अजित पवारांना मंत्रिपद मिळाले नाही, याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी  शरद पवार यांना निमंत्रण आणलं होतं. मला सुद्धा निमंत्रणासाठी फोन आला होता. संघटनात्मक बैठक होती आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्ही दोघेही उपस्थित राहणार नाही असं कळवलं होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजिदादा गटाला मंत्रिपद मिळालं नाही, याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुसऱ्याच्या घरात  ढवळढवळ मी करत नाही. मी भाजपचं पक्षात सोबतच वागणं दहा वर्षे जवळून पाहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळाला नाही,  यात नवल वाटायचं कारण नाही.  यांच्या बद्दल मला फारसं माहित नाही. काही आमदार जर परत येत असतील तर त्या संदर्भात आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल. माझ्या पोटात खूप काही राहतात त्यामुळे मी यावर बोलणार नाही. जर कोणी परत येण्याचा विचार करत असताना तसा प्रस्ताव आला तर त्यावर निर्णय शरद पवार आणि वर्किंग कमिटी घेईल. 

खोके सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्याच्या खासदारांना जर मंत्रीपद मिळत असेल तर चांगला आहे.  मात्र ज्या प्रकारे घटना पुण्यात घडत आहेत त्यावर काहीतरी ॲक्शन घेणे गरजेचे आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख होती. त्याला काळीमा फासण्याचा काम सत्ताधाऱ्यांनी केला आहे. ड्रग्स असेल ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल अशा अनेक घटना घडत आहेत. पाऊस पडला आहे पाणी तुम्हाला आहे त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. अडीच वर्षे झाले  महापालिका निवडणुका नाहीत. हे खोके सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. प्रशासकीय कामांमध्ये होतो  कुठेही लक्ष सत्ताधाऱ्यांचा दिसत नाही, असंही सुळे यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

82 ते 83 मंत्री होऊ शकतात, पण राष्ट्रवादीला संधी नाही; अजित पवारांनी सांगितलं नेमकं काय ठरलं, पराभवाचंही बोलले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget