Mahendra Thorve : दादा भुसे ॲरोगंट, आमच्यामुळे मंत्री, मी त्यांच्या घरचं खात नाही; महेंद्र थोरवेंनी सगळंच बाहेर काढलं!
Shinde Group MLA Fight : विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) आणि दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या धक्काबुक्की झाली. (Dada Bhuse vs Mahendra Thorve)
Shinde Group MLA Fight : विधिमंडळात शिंदे गटाच्या आमदारांमध्ये (Shinde Group MLA ) बाचाबाची झाली. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत राडा झाला. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या राड्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. दादा भुसे ॲरोगंट, आमच्यामुळे ते मंत्री आहेत, मी त्यांच्या घरचं खात नाही, असं म्हणत महेंद्र थोरवेंनी दादा भुसेंवर घणाघात केला आहे. (Dada Bhuse vs Mahendra Thorve)
दादा भुसे ॲरोगंट : महेंद्र थोरवे
''मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत, अशा पद्धतीने ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे, ते जनतेचे काम. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी तुमच्या घरचं खात नाही मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करायला पाहिजे'', असंही थोरवे यांनी म्हटलं आहे.
'मी त्यांच्या घरचं खात नाही'
महेंद्र थोरवे यांनी घडल्या प्रकाराबाबत सांगताना म्हटलं की, ''मुख्यमंत्री शिंदेसोबत आम्ही प्रामणिकपणे काम करत आहोत. गेल्या दोन महिन्यापासून मंत्री दादा भुसे यांच्या खात्यातील कामानिमित्त मी आणि भरत गोगावले त्यांचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. खासदार श्रीकांत शिंदेंनी आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांना काम करु घ्या असं सांगितलं आहे. पण. दादा भुसेंना सांगूनही त्यांनी ते जाणीवपूर्वक केलेलं नाही. त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर, ते माझ्यावरती थोडेसे चिडून बोलले. आम्ही प्रामाणिक आमदार, आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. मी तुमच्या खरी खायला येत नाही. मी सांगितलेलं काम जनतेचं काम माझ्या मतदार संघातील काम झालं पाहिजे, ही आमची इच्छा.''
बैठकीचं काय झालं? त्यानंतर नेमकं काय?
थोरवे यांनी पुढे सांगितलं की, ''मी त्यांना बोललो तर, तुम्ही अशा पद्धतीने आमच्याशी बोलू नका. आम्ही आमदार आहोत आणि तुम्हाला मंत्री आम्ही केले. आम्ही तीन - साडेतीन लाख लोकांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना, आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन सभागृहात येऊन जी काही कामे असतात, ती कामे मंत्र्यांकडून घेण्याचा पाठपुरावा करत असतो. मुख्यमंत्री साहेब प्रत्येक काम करण्यासाठी फोन करा, हे सांगतात, सर्व मदत करतात आणि मंत्री अशा पद्धतीने वागतात, त्या गोष्टीचा फार दुःख होतं आणि म्हणून ते मी एक आमदार म्हणून थोडा तिथेच रिॲक्ट झालो. मतदार संघामध्ये काम करायची होती आणि हे काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा त्या ठिकाणी केलं गेलं नाही. मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, असं सांगितलं. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणून आमच्यात थोडीची शाब्दिक चकमक झाली.''
पाहा व्हिडीओ : मी त्यांच्या घरचं खात नाही : महेंद्र थोरवे
महत्त्वाच्या इतर बातम्या :