एक्स्प्लोर

Yeola Special: शरद पवारांची आज येवल्यात सभा; पण तुम्हाला याच येवल्याचं महत्त्व माहीत आहे का?

Sharad Pawar: छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात आज शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. शरद पवारांनी पावसामुळे आपल्या इतर सभा रद्द केल्या असल्या तरी येवल्यातील सभा त्यांनी रद्द केली नाही.

Nashik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी  राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती, पण सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे शरद पवारांनी सर्व दौरे रद्द केले आहेत. अस असलं तरी शरद पवार नाशिकमधील येवल्यात आज सभा घेणार आहेत. हाच येवला नक्की कोणत्या गोष्टींसाठी प्रचलित आहे, हे आपण पाहणार आहोत. इतिहासातील बऱ्याच घटना येवल्यात (Yeola) घडल्या आहेत, तर महाराष्ट्राची शान असणारी पैठणी देखील येवल्यातच निर्माण केली जाते. 

आंबेडकरांचं येवल्यात धर्मपरिवर्तन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोट्यवधी अनुयायांसह केलेला बौद्ध धम्माचा स्वीकार ही एक क्रांतिकारक घटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिकमधील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार आहोत, हे त्यांनी घोषित केलं नव्हतं. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा आंबेडकरांनी येवल्यात केली होती, त्या ठिकाणी 2014 साली मुक्तिभूमी स्मारक निर्माण केलं गेलं. 1935 पूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचं नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नसल्याची ग्वाही आंबेडकरांनी दिली होती. येवल्यात बौद्ध धर्मियांशी झालेल्या भेटीगाठीनंतर आणि दलित समाजासाठी आवाज उठवण्याच्या अनुषंगाने आंबेडकरांनी येवल्यात धर्मपरिवर्तनाची घोषणा केली होती. 2 मे 1950 रोजी दिल्लीच्या बुद्ध विहारात भाषण करताना बौद्ध धर्म स्वीकारण्याचा आपला विचार असल्याचं सांगितलं.

छगन भुजबळ मुंबईनंतर थेट येवला मतदारसंघात

छगन भुजबळ हे मूळचे नाशिकचे, पण छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मुंबईच्या माझगावमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. राजकारणाची आवड निर्माण झाल्याने त्यांनी 1985 साली माझगावमधून निवडणूक लढवली आणि 1985 आणि 1990 अशा दोन वेळा भुजबळ विधानसभेवर निवडून आले. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर बाळा नांदगावकर या साध्या शिवसैनिकाने त्यांना पराभूत केलं, त्यामुळे माझगाव सोडून भुजबळांना येवल्यात जावं लागलं. 2004 मध्ये भुजबळांनी आपला मतदारसंघ बदलला आणि ते येवला मतदारसंघातून लढले आणि विधानसभेवर जिंकूनही आले. भुजबळांनी येवला मतदारसंघावर आपली पकड इतकी मजबूत केली की 2004, 2009, 2014 आणि नंतर 2019 असं सलग चारवेळा ते येवला मतदारसंघातून निवडून आले. छगन भुजबळ यांच्या येवल्यातील विकासकामांची आणि त्यांनी सेट केलेल्या येवला पॅटर्नची अनेक नेते प्रशंसा करतात.

येवल्याची पैठणी

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा जगप्रसिद्ध पैठणी साडीसाठी प्रसिद्ध आहे. येथे हातमागावरील पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे, आजकाल बऱ्याच ठिकाणी यंत्रमाग देखील वापरले जातात. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या पैठणीवरील नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे, येथील पैठण्या इतर देशांतही निर्यात होतात.

तात्या टोपे यांचा जन्म येवल्यातच झाला

भारतीय उठावातील सेनानी तात्या टोपे यांचा जन्म  इ.स. 1814 मध्ये येवल्यात झाला. 'रामचंद्र' ऊर्फ 'रघुनाथ पांडुरंग येवलेकर' हे तात्या टोपेंचं मूळ नाव. पांडुरंग टोपे यांच्या आठ मुलांपैकी, तात्या हे दुसरे होते. रघुनाथांचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. 1857 च्या स्वातंत्र्यसमरात तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. 1857 मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर, झाशी आणि कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपे होते.

स्वातंत्र्य सेनानी आणि साहित्यिक यदुनाथ थत्तेंचा जन्मही येवल्यात

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नावाजलेलं नाव म्हणजे यदुनाथ दत्तात्रय थत्ते. 5 ऑक्टोबर 1922 मध्ये त्यांचा येवल्यात जन्म झाला. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेल्या थत्ते यांना 1942 साली 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल सहा महिने कारावास ठोठावण्यात आला होता. यदुनाथ थत्ते हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक, संपादक आणि मराठी साहित्यिक होते. ते 'साधना साप्ताहिका'चे संपादक होते.

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचा येवल्यात जन्म

ललिता पवार ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. 18 एप्रिल 1916 रोजी नाशिकच्या येवल्यात झाला. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिकेत काम करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार अशा नावाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये कामं केली होती. त्यानंतर त्यांच्या डोळ्याला इजा झाल्यानॆ त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या. दूरदर्शनवरील रामायण या मालिकेमध्ये त्यांनी मंथरेची भूमिका केली होती.

हेही वाचा:

Sharad Pawar Yeola : शरद पवारांना ठाकरे गटाकडून भक्कम साथ, येवल्यात 2024 ला बदल होणार, आमदार दराडेंचा दावा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget