एक्स्प्लोर

शरद पवार विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरी दाखल, एकनाथ शिंदे समर्थक माजी आमदाराची हजेरी, माढ्यात महायुतीला धक्का

Madha Lok Sabha Seat : माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणितं बदलत असल्याचं चित्र आहे. धैर्यशील मोहिते पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना उमेदवारी  दिली जाणार हे निश्चित झालं आहे. धैर्यशील मोहिते पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आता माढ्यातून शरद पवारांच्या पक्षाच्यावतीनं धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्यानं रंगतदार लढत होणार आहे.शरद पवार अकलूजमध्ये दाखल झालेले असताना एकनाथ शिंदे यांचे समर्थक माजी आमदार नारायण पाटील (Naryan Patil) देखील बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यामुळं महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

आज अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार , सुशीलकुमार शिंदे हे भोजनासाठी पोहोचले आहेत . आज दुपारी चार वाजता जयंत पाटील हेदेखील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचणार असून येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह कुटुंबीय व इतर हजारो कार्यकर्ते आज प्रवेश करणार आहेत. शरद पवार , विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे एकत्रित आल्यानं याचा परिणाम माढा, सोलापूर या लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर दिसणार आहे. 

शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून यावेळी प्रवीणदादा गायकवाड , शेकाप चे भाई जयंत पाटील , बाबासाहेब देशमुख , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे उपस्थित आहेत.विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्हील चेअरवर बसून शरद पवारांचं स्वागत केलं.  करमाळा येथील महायुतीचे माजी आमदार नारायण पाटील मोहिते पाटील यांच्या घरी पोहोचल्यानं महायुतीला धक्का बसला आहे. शिंदे शिवसेनेचे नेते मोहिते यांच्या घरी पोहोचल्याने हा महायुतीला धक्का मानला जात आहे. 2019 किरकोळ मतांनी पराभव झाला होता. सध्या करमाळ्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे महायुतीसोबत आहेत. महायुतीत ही जागा संजयमामा शिंदे यांच्याकडे जाऊ शकते. त्यामुळं नारायण पाटील आज विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेऊ शकतात, अशी माहिती आहे.  

दुसरीकडे माढा येथील काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे हे देखील दाखल झाले आहेत. याशिवाय सांगोला विधानसभा मतदारसंघात शेकापचा प्रभाव आहे. येथील शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख आणि करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत

संबंधित बातम्या : 

Salman Khan House Firing : मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त; सलमान खान गोळीबार प्रकरणी संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

 मोठी बातमी : विशाल पाटील सांगलीतून काँग्रेस पक्षाच्या वतीनेच भरणार उमेदवारी; पण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Embed widget