Pune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी
पुणे : पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांवर अनेक विरोधकांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर आता पुणे पोलीस या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करताना दिसत आहे. या अपघाताची संबंधित असलेल्या व्यक्तींना पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात येत आहे आणि सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. सकाळी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांची चोकशी करण्यात आली त्यानंतर आता या अपघाताच्या वेळी गाडीत हजर असलेल्या ड्रायव्हरला चोकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
कल्याणी नगरमध्ये अल्पवयीन मुलाकडून जेव्हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये शेजारच्या सीटवर ड्रायव्हर देखील बसला होता. या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असून गुन्हे शाखेकडून त्याची चौकशी करण्यात येतेय. गंगाराम पुजारी असं या ड्रॉयव्हरचं नाव आहे. विशाल अग्रवालने आपल्या अल्पवयीन मुलाला गंगारामसोबत पाठवलं होतं. मात्र पार्टीत दारू पिल्यानंतर या अल्पवयीन मुलाने गंगारामला बाजूच्या सीटवर बसायला सांगून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर गाडी चालवायला बसला आणि वेगाने गाडी चालवून दोघांचा बळी घेतला.