Sharad Pawar : शरद पवार यांना निमंत्रण देणं सरकारनेच टाळलं? निमंत्रण पत्रिकेत पवाराचं नाव वगळलं
Baramati News : शरद पवार यांच्याकडून राज शिष्टाचार विभागाला शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये, अशा कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
Sharad Pawar News : बारामतीत (Baramati) होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यावरून (Namo Rojgar Melava) सध्या राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत मोठा घोळ झाल्याचं दिसून आलं आहे. या कार्यक्रमाne राज्यसभेचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. यानंतर नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहण्यास आपल्याला आवडेल अशा आशयाचं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं. दरम्यान, निमंत्रण पत्रिकेत नाव लिहिण्याबद्दल शिष्टाचार विभागाला आपण कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचं पवारांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार यांना निमंत्रण देणं सरकारनेच टाळलं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शरद पवार यांना निमंत्रण देणं सरकारनेच टाळलं?
बारामतीच्या कार्यक्रमासंदर्भात राजशिष्टाचार विभागाने शरद पवार यांच्या कार्यालयाला शरद पवारांच्या उपस्थितीबाबत विचारण्यापूर्वीच शरद पवार यांनी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक आहोत असं पत्र दिलं होतं. शरद पवार यांच्या कार्यालयाने शरद पवार उपस्थित राहण्यास इच्छुक असल्याचे पत्र देऊन देखील निमंत्रण पत्रिकेवर सरकारच्यावतीने नाव छापलं नाही. शरद पवार यांच्याकडून राज शिष्टाचार विभागाला शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये, अशा कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शरद पवार यांना निमंत्रण देणं सरकारनेच टाळलं, असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार कार्यालयाकडून माहिती
राजशिष्टाचार विभागाकडून शरद पवार यांना केवळ तुळापूरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहात का याबाबत विचारणा, शरद पवार यांच्या कार्यालयाकडून मात्र या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार नसल्याची राज शिष्टाचार विभागाला माहिती दिली आहे. 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
राज शिष्टाचार विभागाकडून राजकारण?
बारामतीमध्ये शनिवारी नमो रोजगार मेळावा पार पडणार असून याकडे संपूर्ण राज्याचं सुरु आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज शिष्टाचार विभागाकडून राजकारण करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे. निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळल्याची सूचना शरद पवार कार्यालयाकडून देण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.
निमंत्रणावरून राजकारण
शरद पवार यांच्या कार्यालयाकडून शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव वगळण्याची सूचना देण्यात आल्याचं राज शिष्टाचार विभागाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, एबीपी माझाने शरद पवार कार्यालयाला विचारलं असता, अशी कोणतीही सूचना दिली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. बारामतीतील नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत कोणतीही माहिती शरद देण्यात आली नसल्याचं शरद पवार कार्यालयाने सांगितलं आहे.
'निमंत्रण हा आदरातिथ्यचा भाग, राजकारणाचा नाही'
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, निमंत्रण हा आदरातिथ्यचा भाग आहे, राजकारणाचा नाही. कोणत्या पक्षाचे नेते आहेत, यात हे बघितलं जात नाही. पवार साहेब यांचा निमंत्रण पत्रिकेत नाव नाही, ते असणं-नसणं यावर ते रुसणारे नाहीत. आम्हाला वावगं वाटायचं कारण नाही. ते जेवायला गेले किंवा बोलवलं त्यामुळे विचार पवार यांचे बदलणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.