एक्स्प्लोर

Mahadev Jankar: शरद पवारांचा खास प्लॅन, महादेव जानकरांना माढ्यातून पाठिंबा देणार अन् बारामती सुरक्षित करणार?

Maharashtra Politics: शरद पवार धनगर समाजाची ताकद आपल्या बाजूने वळवणार, महादेव जानकरांना माढ्यातून उमेदवारी? शरद पवारांची खास रणनीती. बारामती, माढा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

बारामती: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बुजुर्ग आणि सर्वात अनुभवी नेता अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी राजकीय मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यंदा अजित पवार भाजपसोबत असल्याने बारामतीची लढाई सुप्रिया सुळे यांच्यासाठी कधी नव्हे इतकी अवघड असेल. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) स्वत: मैदानात उतरुन रणनीती आखताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्याकडून आता महादेव जानकर यांना सोबत घेतले जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी माढ्याची जागा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्यासाठी सोडण्याची तयारीही दाखवल्याचे सांगितले जाते. 

बारामती, माढा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना मोठ्याप्रमाणावर मतदान झाले होते. जानकरांची हीच ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. येत्या 6 आणि 7 मार्चला मुंबईत महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभेचे जागावाटप अंतिम होण्याची शक्यता आहे. या जागावाटपात माढा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार गटाला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे महादेव जानकर सोबत आल्यास आम्ही माढ्याची जागा धनगर समाजाला द्यायला तयार आहोत, अशी भूमिका शरद पवार गटाने घेतल्याचे समजते. त्यामुळे आता महादेव जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाशी युती करणार का, हे पाहावे लागेल. 

महादेव जानकर सोबत आल्यास काय फायदा होणार?

राज्यात 2014 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेव्हा महादेव जानकर त्यांच्यासोबत होते. परंतु, ते सध्या महायुतीसोबत आहेत किंवा नाही, याबाबत जानकरांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. सध्या माढा लोकसभेत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार आहेत. त्यांच्या जागी भाजपकडून नवा उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो. तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येईल. स्वत: शरद पवार 2009 मध्ये माढ्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. परंतु, आता शरद पवार यांच्याकडून बारामतीची जागा सुरक्षित करण्यासाठी महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी दिली जाऊ शकते. 

महादेव जानकर यांच्या पाठिशी धनगर समाजाची मोठी ताकद असल्यामुळे बारामती आणि माढा अशा दोन्ही ठिकाणी फायदा होऊ शकतो. जानकरांशी युती केल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर होईल. तसेच महादेव जानकरांनी माढ्याची जागा जिंकल्यास महाविकास आघाडीची आणखी एक जागा वाढू शकते. 

आणखी वाचा

वावरातून बांधावर ते वापरून फेकून देतात; बच्चू कडू, महादेव जानकर, सदाभाऊंची 'महा खदखद' उफाळली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Accident Car Airbag Death : कारमध्ये मुलांना पुढं बसवताय? हा व्हिडीओ पाहा Special ReportTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 24 December 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Cabinet Minister : मंत्रिपदी बढती, सुरु झाली झाडाझडती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात, पटरीवरुन घसरला डब्बा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Embed widget