..त्यांनी चहाचा कॅफे टाकला असला तरी उबाठाची चहाची टपरीही चालत नाही, संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्यूत्तर, म्हणाले..
शिवाजी पार्कवर चहाचा कॅफे उघडलाय तिथे चहा पानाच्या कार्यक्रम होतात असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.

Sanjay shirsat: शिवाजी पार्कवर चहाचा कॅफे उघडलाय तिथे चहा पानाच्या कार्यक्रम होतात असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावल्यानंतर आता मंत्री संजय शिरसाटांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय . त्यांनी कॅफे टाकला असला तरी यांची चहाची टपरी ही चालत नाही .उभाठाची अवस्था अशी झाली आहे की, त्यांना लोकांना फोन करून बोलवा लागतं पण त्यांच्या दरवाजात जायला कोणी तयार होत नाही . अशी यांची अवस्था असल्याचं प्रत्युत्तर शिरसाटांनी दिलंय . दरम्यान दीनानाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालयात झालेल्या प्रकारावरही शिरसाट यांनी तपासणी होण्याची गरज असल्याचं म्हटलं . (Sanjay Shirsat)
काय म्हणाले संजय शिरसाट ?
अनेक मोठे रुग्णालय योजनेत बसत असताना अगोदर पैसे घेतात नंतर उपचार करतात.योजनेचे पैसे येईपर्यंत घेतात.ही चुकीची पद्धत सुरू आहे.धर्मदाय नियमानुसार तुम्हाला सुविधा मिळता.रुग्ण दगावल्यानंतर देखील पैसे मागितले जातात.पुण्यातील प्रकरणानंतर प्रकाराला वाचा फुटली आहे.जनतेने यापुढे तक्रारी मुख्यमंत्र्यांना पाठवले पाहिजे.10 टक्के बेड रिझर्व असेव हे धोरण आहे.मात्र यांची अंमलबजावणी होत नाही.अस करणाऱ्या रुग्णालयाचे परवाने रद्द झाले पाहिजे.साधा ताप आला तर 10 हजार बिल होते हे बदलायची गरज आहे.दवाखाना उघडताच तो शाहकीय यादीत येण्याचा प्रयत्न करतो.याची तपासणी होण्याची गरज आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेवर उबाठा पक्षाची अवस्था अशी झाली यांना फोन करून बोलावं लागत आहे.राज यांच्या कॅफे लोक येतात मात्र यांच्या चहाच्या टपरीत कुणी येत नाही.सामंत काय करता यांची चिंता करू नका,पक्षात राहून दलाली करण्याचे काम ते करत नाही.तुम्ही कुणाच्या पक्षाचे आहे ते निश्चित करा.कामरा आणि राऊत यांच्यात फरक नाही.त्यामुळे त्यांची दोस्ती होऊ शकत.ते उद्धव ठाकरेंवर गण काढू शकता. भाजपचे नाते उबाठासह इतर पक्षाला समजून सांगत होते.यांच्या पायघड्या घालत होते असे नाही 5 आमदार नाही शिल्लक आहे खासदार आहे.हे लोक लवकर पक्षप्रवेश करेल.४० वर्ष त्यांनी केलेल्या या घोषणा आहे.आम्ही मदत करण्याची तयारी दाखवतो.आर्थिक बाजू सक्षम झाली की नक्की मदत करू. असेही ते म्हणाले.औरंगजेब कबर ज्या गावात आहेत त्या गावच नाव खुलताबाद बदलून रत्नपूर करा .त्या गावात संभाजीमहाराज स्मारक करा ही सेनेची भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा:


















