एक्स्प्लोर

Team India: गौतम गंभीरच्या घरी पार्टी, टीम इंडियातील खेळाडूंना निमंत्रण; कोण-कोण उपस्थित राहणार?, सगळी माहिती समोर

IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल.

IND vs WI 2nd Test: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 140 धावांनी विजय मिळवला. आता 10 ऑक्टोबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पार्टीचे आयोजन केले आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा कसोटी सामना (Ind vs WI 2nd Test) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे घर देखील दिल्लीत आहे, म्हणून गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीम इंडियातील खेळाडूंना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित (Party In Gautam Gambhir) केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीपूर्वी होणाऱ्या या डिनर पार्टीसाठी सर्व खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. या पार्टीसाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिया संपूर्ण संघ जाणार आहे.

गौतम गंभीरच्या पार्टी कधी होणार? (Party In Gautam Gambhir House)

वृत्तानुसार, बुधवार, 8 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियममध्ये सराव सत्र पूर्ण केल्यानंतर, संपूर्ण संघ गौतम गंभीरच्या घरी जेवणासाठी जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघाने अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा मोठ्या प्रमाणात पराभव केला. दुसरी कसोटी जरी अनिर्णित राहिली तरी टीम इंडिया मालिका जिंकेल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरी कसोटी कधी आहे? (Ind vs WI 2nd Test Match)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी खेळली जाईल. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजता हा सामना सुरू होईल. याआधी या ठिकाणी 35 कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि गेल्या दोन वर्षांत येथे खेळली जाणारी ही पहिलीच कसोटी आहे. भारत आणि वेस्ट इंडिजने यापूर्वी अरुण जेटली स्टेडियमवर सात वेळा कसोटी सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजने टीम इंडियाला दोनदा पराभूत केले आहे, तर भारतीय संघाने फक्त एकदाच वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. इतर चार सामने अनिर्णित राहिले आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (Team India Squad WI)

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, प्रसिद कृष्णा, कुलदीप यादव

संबंधित बातमी:

Rohit Sharma Salary Ind vs Aus ODI: शुभमन गिल एकदिवसीय संघाचा कर्णधार; रोहित शर्माला आता किती पगार मिळणार?

Ind beat Wi 1st Test : टीम इंडियाने फक्त तीन दिवसांत वेस्ट इंडिजचा फडशा पाडला, अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय, WTC क्रमवारीत काय बदल?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election: विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेण्याच्या तयारीत, निवडणूक आयोग महत्त्वाची घोषणा करण्याच्या तयारीत
विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेणार?
सावधान! पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, कुठे अलर्ट ?
सावधान! पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, कुठे अलर्ट ?
Salman Khan Shirtless Look: 59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हार्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs
59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हार्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs
Mhada Home: पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी! 90 लाखाचं घर मिळणार फक्त 28 लाखात! कुठे आणि कसा अर्ज करायचा?
पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी! 90 लाखाचं घर मिळणार फक्त 28 लाखात! कुठे आणि कसा अर्ज करायचा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'नाचता येईना अंगण वाकडं', Gopichand Padalkar यांचा MVA आघाडीवर हल्लाबोल
Maharashtra Civic Polls: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल, आज घोषणा?
Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका
State Election Comission : मतदार याद्यांमध्ये घोळ, तरीही निवडणुकांची घोषणा होणार?
Quota Politics: 'तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन', माजी खासदार Haribhau Rathod यांचा सरकारला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election: विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेण्याच्या तयारीत, निवडणूक आयोग महत्त्वाची घोषणा करण्याच्या तयारीत
विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार, मतदार यादीत बदल न करताच सरकार निवडणूक घेणार?
सावधान! पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, कुठे अलर्ट ?
सावधान! पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, कुठे अलर्ट ?
Salman Khan Shirtless Look: 59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हार्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs
59 वर्षांच्या भाईजानचा शर्टलेस लूक पाहून तरुणींचे हार्टफेल; सिक्स पॅक अ‍ॅब्सची बातच और... PHOTOs
Mhada Home: पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी! 90 लाखाचं घर मिळणार फक्त 28 लाखात! कुठे आणि कसा अर्ज करायचा?
पुणेकरांना घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी! 90 लाखाचं घर मिळणार फक्त 28 लाखात! कुठे आणि कसा अर्ज करायचा?
चोरीला गेलेला बैल हवाय?  जन्माचा दाखला द्या .. पोलिसांच्या अजब प्रश्नाने मालक चक्रावला, चोरट्याचं  CCTVही आलं, नेमका प्रकार काय?
चोरीला गेलेला बैल हवाय? जन्माचा दाखला द्या .. पोलिसांच्या अजब प्रश्नाने मालक चक्रावला, चोरट्याचं CCTVही आलं, नेमका प्रकार काय?
Maithili Thakur Controversy: ब्लू प्रिंटचा प्रश्न, मैथिली ठाकूरला वाटलं फिल्म, म्हणाली, 'कॅमेऱ्यावर कसं सांगू, ती वैयक्तिक बाब'
ब्लू प्रिंटचा प्रश्न, मैथिली ठाकूरला वाटलं फिल्म, म्हणाली, 'कॅमेऱ्यावर कसं सांगू, ती वैयक्तिक बाब'
Mumbai Crime News : लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकावर कारवाईचा बडगा; पोलीस महासंचालकांकडून बडतर्फीची कारवाई
लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकावर कारवाईचा बडगा; पोलीस महासंचालकांकडून बडतर्फीची कारवाई
Suniel Shetty Invests In Excelmoto Electric Mobility: सुनील शेट्टीनं जावई, लेकासोबत सुरू केलाय नवा बिझनेस; महिलांसाठी उपयुक्त वस्तू केलीय लॉन्च
सुनील शेट्टीनं जावई, लेकासोबत सुरू केलाय नवा बिझनेस; महिलांसाठी उपयुक्त वस्तू केलीय लॉन्च
Embed widget