एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

मग तुम्ही खरे वारसदार आहात का? मंडलिकांच्या 'त्या' विधानावर संजय राऊतांचा प्रश्न, थेट वडिलांचा दिला दाखला!

संजय मंडलिकांच्या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या याच विधानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : आत्ताचे छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) हे कोल्हापूरचे (Kolhapur) खरे वारसदार नाहीत, असं विधान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केलं. या विधानानंतर राजकीय पटलावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. दरम्यान, आता याच प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Shivsena) नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संजय मंडलिक यांना सुनावलं आहे. त्यांनी मंडलिक यांच्या विडलांचा दाखला देत संजय मंडलिकांचे कान टोचले आहेत. ते आज (12 एप्रिल) माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.   

सदाशीवराव मंडलिकांचा दिला दाखला

छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे संजय मंडलिक शाहू महाराजांचे विरोधक आहेत. प्रचारभेत मंडलिक यांनी शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत. त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं, असं मंडलिक म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर राऊत यांनी खोचक भाष्य केलंय. "छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्याचे खरे वारसदार नसतील तर मग संजय मंडलिक हे वारसदार आहेत का. माझ्या माहितीप्रमाणे सदाशिवराव मंडलिक हे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते. शाहू, फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच ते कोल्हापुरात काम करत होतो. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची गादी आहे. त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू शरकते आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानावर चिखलफेक केली जात आहे. हे चांगले लक्षण नाही," अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.  

महाराष्ट्र हे कधीच सहन करणार नाही

शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भूमिका घेतलेली आहे. ते आधीपासूनच सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी मंडलिकांनी ही भाषा वापरली. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी मंडलिकांनी दिला.  

हेही वाचा :

बोलताना एक शब्द चुकलो, पण मी अपमान केला नाही; संजय मंडलिक तोल सुटलेल्या वक्तव्यावर ठाम

आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिकांचा तोल सुटला

भाजप का सोडली? महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी सांगितले कारण, म्हणाले भाजपात सत्य वेगळं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'Sharad Koli on Praniti Shinde : प्रणिती शिंदे तुला काय तुझ्याबापाला सुद्धा भीत नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget