एक्स्प्लोर

सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...

Maharashtra Cabinet Expansion : शिवसेना शिंदे गटातून तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदातून डच्चू देण्यात आलाय.

Sanjay Gaikwad : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य दिसून आले. शिवसेना शिंदे गटातून मंजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना डच्चू देण्यात आला. त्यामुळे हे नेते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

संजय गायकवाड म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. काही नव्या चेहऱ्यांना संधी देताना काही धक्के सुद्धा बघितले. अडीच वर्षाचा फॉर्मुला योग्य आहे. कारण नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांनी मंत्रीपद भोगली आहेत. त्यामुळे त्यांना नाराज व्हायचं काम नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

मी मंत्रीपदासाठी मागणी करणार : संजय गायकवाड

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेतील मंत्र्यांना अडीच वर्ष झाल्यानंतर मी मंत्रीपदासाठी मागणी करणार आहे. महायुतीमध्ये  लोकसभा निवडणुकीत खासदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी काम केलं नव्हतं. याची तक्रार मी एकनाथ शिंदे यांच्याश अमित शाह यांच्याकडे केली. मात्र, मला वाटत नाही माझ्या तक्रारीमुळे भाजपच्या एका आमदाराचे मंत्रिपद हुकले, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

मी नाराज नाही : दीपक केसरकर

दरम्यान, नाराजीच्या चर्चांवर दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की, मी नाराज नाही. अडीच वर्ष मला मंत्रिपद मिळालं मी त्यात खुश आहे. आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी आहे. शेवटी इतरांनाही संधी मिळायला हवी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर  तानाजी सावंत काल शपथविधी सुरु असताना राजभवनात आले नाही. तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले होते. आजपासून अधिवेशन असल्याने सर्व आमदार नागपुरात असताना तानाजी सावंत माघारी परतले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sadabhau Khot : आमची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले, सदाभाऊ खोतांची मंत्रिपद न मिळाल्यानं खंत

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget