Panipat Crime : आपल्याच मुलासह आणखी चार मुलांची क्रूरपणे हत्या Special Report
आता एक धक्कादायक कहाणी.... ही कहाणी आहे आपल्याच मुलासह आणखी चार मुलांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या एका महिलेची. हरियाणाच्या पानिपतमधील एका महिलेनं गेल्या दोन वर्षात चार मुलांची हत्या केल्याचं समोर आलं... पहिल्या तीनही हत्या तिनं पचवल्या... पण चौथ्या हत्येनंतर मात्र तिचं हे दुष्कृत्य समोर आलं... कोण आहे ही सायको किलर? हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
हीच आहे चार चिमुकल्यांचा जीव घेणारा सायको किलर...
हा चेहरा आहे अशा एका आईचा जिनं स्वत:च्याच मुलाचा जीव घेतलाय...
हरियाणाच्या पानिपतमधली ही आहे सायको किलर पूनम...
तिच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावरून ती मुंगीही मारू शकत नाही असं वाटेल मात्र तिनं तब्बल चार चिमुकल्यांची क्रूर हत्या केलीय.
चौथ्या हत्येच्या वेळी तिचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी तिला जेरबंद केलंय.
या चारही घटना नेमक्या तिनं का आणि कशा केल्या जाणून घेऊया...
2019 मध्ये पूनमचं लग्न सोनीपतच्या नवीन याच्या सोबत झालं...
दरम्यानच्या वर्षात पूनमला एक मुलगाही झाला...
पूनमचा मुलगा शुभम याच्या दिसण्यावरून आणि त्याच्या रंगावरून कुटुंबिय त्याला चिडवायचे... ज्याचा पूनमला राग येऊ लागला...
त्याचमुळे आपल्या मुलापेक्षा कुणी चांगलं दिसू नये अशी भावना तिच्या मनात घर करू लागली... ज्याचा शेवट या चिमुकल्या मुलींच्या हत्यांनी झाला...
GFX
पहिली आणि दुसरी हत्या - जानेवारी 2023
- पूनमची नणंद सुट्ट्यांमध्ये मुलींना घेऊन माहेरी आली
- तिच्या नणंदेला इशिका ही 9 वर्षांची मुलगी
- पूनमच्या डोक्यात इशिकाच्या चांगलं दिसण्याचा राग
- इशिका आणि शुभम घराबाहेर खेळत होते
- वेळ साधून पूनमनं इशिकाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं
- मुलगा शुभम याची वाच्यता करेल म्हणून त्याचीही हत्या
- दोन्ही मुलं खेळताना पाण्याच्या टाकीत प़डून मेल्याची बतावणी
- पूनमचा मुलगाही गेल्यानं कुणाला संशय आला नाही
GFX OUT
((BYTE - आईचा बाईट ))
GFX 2
तिसरी हत्या - ऑगस्ट 2025
- ऑगस्टमध्ये पूनम तिच्या माहेरी आली
- पूनमची 6 वर्षांची भाची जिया हिच्या हत्येचा कट
- जिया आणि शुभमच्या दिसण्याची तुलना होत असे
- जियालाही पूनमनं पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं
- खेळताना जिया पाण्याच्या टाकीत पडल्याची बतावणी
- पूनमविरोधात पुरावे नसल्यानं अपघात असावा असा संशय
GFX OUT
व्हिओ - २
जानेवारी 2023 आणि ऑगस्ट 2025 अशा साधारण दीड वर्षांच्या कालावधीत पूनमनं तीन चिमुकल्यांच्या हत्या केल्या.
मात्र तिची भूक काही संपली नव्हती... त्यातूनच तिनं चौथी हत्या करायचं ठरवलं आणि यावेळी ती चांगलीच कचाट्यात सापडली.
GFX IN -
चौथी हत्या - 1 डिसेंबर 2025
- नातेवाईकांच्या लग्नाच्या निमित्तानं पूनम नवलता गावी
- 1 डिसेंबरला लग्न, 26 नोव्हेंबरला पूनम गावी आली
- 30 नोव्हेंबरला नवीनचा मावसभाऊ मुलांना घेऊन आला
- 7 वर्षांची मुलगी विधी आणि 1 वर्षांचा मुलगा दिव्य
- 1 डिसेंबरच्या दुपारी बरं नाही सांगून पूनम घरी थांबली
- पाहुणे लग्नाच्या ठिकाणी गेल्यावर विधी खेळत असताना पूनमनं डाव साधला
- स्टोअर रूममधल्या प्लास्टिक टबमध्ये तिनं विधीला बुडवून मारलं
- विधीच्या मृत्यूची खात्री झाल्यावर पूनमनं काढता पाय घेतला
GFX OUT
व्हिओ - 3
विधीच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्यूमुळे सगळे धास्तावले.
विधीचे आजोबा रिटायर्ड पोलीस ऑफिसर असल्यानं त्यांना हत्येचा संशय आला.
पूनमला त्याचवेळी काही नातेवाईकांनी शिड्यांवरून खाली उतरताना पाहिलं होतं... तिचे कपडेही त्यावेळी भिजले होते...
अखेर बिंग फुटलं आणि ४ चिमुकल्यांचा जीव घेणारी ही वैरीण समोर आली...
तपासाच्या वेळी तिनं ४ चिमुकल्यांचा कसा जीव घेतला याची कहणी सांगितली ज्यामुळे सारेच हादरून गेले.
चांगला दिसत नाही म्हणून तिच्या मुलाला चिडवल्याचा राग पूनमच्या इतक्या डोक्यात बसला की त्याचा इतका थरारक शेवट सगळ्यांना अनुभवावा लागला.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































