(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : राज ठाकरे बीडमध्ये, मनसैनिक अन् शिवसैनिकांमध्ये राडा, शिवसेना जिल्हाध्यक्षाचा शर्ट फाडला
Raj Thackeray and Shivsena : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे बीड (Beed) शहरामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, बीडमध्ये त्यांचे आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena Uddhav Thackray) कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता.
Raj Thackeray and Shivsena : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे बीड (Beed) शहरामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, बीडमध्ये त्यांचे आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena Uddhav Thackray) कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केवळ राजकीय विरोधातून हा प्रयत्न झाला याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय.
मनसे शहराध्यक्ष करण लोंढे आणि शैलेश जाधव या दोघांनी या आंदोलना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काही काळ मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांचे शर्ट सुद्धा फाडण्यात आलाय. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुरुवात तुम्ही केली पण, आम्ही शेवट करणार, असं संदीप देशपांडे म्हणाले.
राज ठाकरे बीडमधील 6 मतदारसंघांचा आढावा घेणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी बीडमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान ठाकरेंचे आगमन झाल्यानंतर त्याचे मनसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जालना रोड परिसरात अडीच क्विंटल फुलाच्या हाराने जेसीबीच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. राज ठाकरे आज आणि उद्या दोन दिवस बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत. राजकीयदृष्ट्या बीड जिल्हा अतिशय महत्वाचा आहे. याच जिल्ह्यात मनसे आपली राजकीय ताकद वाढू पाहत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत होती. मात्र विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा राज ठाकरे आज घेणार आहेत.
धाराशिवमध्ये राज ठाकरेंना आंदोलकांनी जाब विचारला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यापूर्वी सोलापुरात असताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यापूर्वीही धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले होते. त्यांनी राज ठाकरेंना आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जाब विचारण्यास सुरुवात केली होती. यावेळी राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चाही झाली होती.
Raj Thackeray Beed : राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर फेकल्या सुपाऱ्या, बीडमध्ये तुफान राडा!
इतर महत्वाच्या बातम्या
चंद्रशेखर राव यांच्या पार्टीचा रंग गुलाबी होता, मात्र तेलंगणात त्यांच्या पक्षाची दाणादाण झाली, अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला, वळसे पाटलांवरही हल्लाबोल