चंद्रशेखर राव यांच्या पार्टीचा रंग गुलाबी होता, मात्र तेलंगणात त्यांच्या पक्षाची दाणादाण झाली, अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला, वळसे पाटलांवरही हल्लाबोल
Amol Kolhe on Dilip Walse Patil, Pune : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि दुधात अळ्या निघाल्या. मात्र मंत्री मूग गिळून गप्प का? असा थेट सवाल करत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवस्वराज्य यात्रेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर (Dilip Walse Patil) टीका केली.
![चंद्रशेखर राव यांच्या पार्टीचा रंग गुलाबी होता, मात्र तेलंगणात त्यांच्या पक्षाची दाणादाण झाली, अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला, वळसे पाटलांवरही हल्लाबोल Amol Kolhe on Ajit Pawar Chandrasekhar Rao party was Pink but his party was divided in Telangana Dilip Walse Patil Marathi News चंद्रशेखर राव यांच्या पार्टीचा रंग गुलाबी होता, मात्र तेलंगणात त्यांच्या पक्षाची दाणादाण झाली, अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला, वळसे पाटलांवरही हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/09/3120f25679b14d5364da0d7110b339c61723205773358924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amol Kolhe on Dilip Walse Patil, Pune : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि दुधात अळ्या निघाल्या. मात्र मंत्री मूग गिळून गप्प का? असा थेट सवाल करत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवस्वराज्य यात्रेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर (Dilip Walse Patil) टीका केली.
अमोल कोल्हे म्हणाले, आजच्या दिवशी आपण जुलमी इंग्रज सत्तेला आपण इशारा दिला होता, चलेजाव म्हणूनच आज शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. त्याच पद्धतीने जे महायुती सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही. जे महायुतीचे सरकार युवकांचा विचार करत नाही. जे महायुतीचे सरकार मराठी माणसाचा स्वाभिमान जपत नाही, त्या महायुतीला चलेजाव म्हणण्याची वेळ आली आहे.
तिथे चंद्रशेखर रावांच्या पार्टीचा गुलाबी रंग होता, तिथे पक्षाची दाणादाण झाली
पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, कधीतरी वाटायचं शेतकऱ्याचं सरकार आहे, त्यामुळे काळ्या आईच्या रंगाचं असलं. कधीतरी ऐकलं होतं छत्रपती शिवरायांचं सरकार आहे, त्यामुळे भगवा रंग असेल. पण कोणताही रंग निवडताना गुलाबी रंग निवडला याला एक योगायोग आहे. यापूर्वी तेलंगणामध्ये निवडणूक झाली. तिथे चंद्रशेखर रावांच्या पार्टीचा गुलाबी रंग होता, तिथे पक्षाची दाणादाण झाली, असं म्हणत अजित पवारांनी डिवचलं. पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, स्वार्थासाठी केलेल्या गद्दारीवर पडदा टाकण्याची योजना म्हणजे लाडका पडदा योजना आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. इतिहासातील तानाजी मालुसरे आठवतात, बाजीप्रभू देशपांडे आठवतात. छत्रपती संभाजी महाराज आठवतात. यातील कोणीही गद्दारी केली नव्हती. यातील कोणीही विश्वासघात केलेला नव्हता.
क्रेन अपघातात अमोल कोल्हेंच्या हाताला दुखापत
शिवस्वराज्य यात्रेदरम्यान क्रेन कलली होती, या अपघातात खासदार अमोल कोल्हेच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळेच हाताला बँडेज लावून ते पुढच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालेत. आज सकाळी जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनद्वारे पुष्पहार अर्पण केला जात होता. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख थोडक्यात बचावले होते. त्यानंतर जुन्नरच्या लेण्याद्रीत कोल्हे सभेला हजर राहिले, पण मंचरच्या सभेपुर्वी त्यांनी रुग्णालय गाठलं. डॉक्टरांकडून उपचार घेत, हाताला बँडेज लावून ते यात्रेत सहभागी झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Chandrakant Patil : तुम्ही दाखवणार असाल तर आम्ही काय गोट्या खेळतो काय? चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)