केजरीवालांनी स्वतःचा प्रचार करावा ही अट कोर्टाने का घातली? मोदींनी अटी लिहून दिल्यात का? पृथ्वीराज चव्हाणांचे संतप्त सवाल
Prithviraj Chavan on Arvind Kejriwal, Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेचा आम्ही निषेध केला होता. त्यांना प्रचारासाठी जामीन मिळाला याचे आम्ही स्वागत करतो. पण सुप्रीम कोर्टाने काही अटी चुकीच्या अटी लादल्या आहेत.
Prithviraj Chavan on Arvind Kejriwal, Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेचा आम्ही निषेध केला होता. त्यांना प्रचारासाठी जामीन मिळाला याचे आम्ही स्वागत करतो. पण सुप्रीम कोर्टाने काही अटी चुकीच्या अटी लादल्या आहेत. केजरीवाल यांनी फक्त स्वतःचा प्रचार करावा अशी अट सुप्रीम कोर्टाने का लावली, मोदींनी ही अट लिहून दिली का? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. ते दिल्लीत बोलत होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झालाय. अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 1 जूनपर्यंत असेल. अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा, अशी मागणी केली. मात्र, प्रचार 48 तास अगोदर संपतो असं सांगत 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काही बोलू शकत नाहीत. पंजाबमध्ये 25 मे तर दिल्लीत 1 जूनला मतदान होणार आहे, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली, तेव्हा मी कोल्हापूरमध्ये होतो
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली, तेव्हा मी कोल्हापूरमध्ये होतो. माझ्या कानावर खून झाल्याची बातमी आली. तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती की ज्या प्रवृत्तींनी गांधीजींची हत्या केली त्याच प्रवृत्तींनी दाभोळकर यांचा खून केला. आजही मी ते म्हणेन. मी हिंदुत्ववाद्यांचे नाव वगैरे काही घेतल नाही. 2014 साली आम्ही केंद्र सरकारला 1 हजार पानाचे दस्तावेज पाठवलं होतं. ते अतिशय गंभीर होतं. आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्यांनी लक्षात घ्यावं.
तेव्हा आम्हाला फक्त 6-7 महिन्यांत मिळाले. तुम्हाला अकरा वर्षे का लागली?
हत्या व्हायच्या आधी सनातन संस्थेवर राष्ट्रीय बंदी आणावी
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, फक्त दाभोळकर यांची हत्या झाली नाही, तर गौरी लंकेश यांची हत्या झाली, पानसरे यांची हत्या झाली. हत्या व्हायच्या आधी सनातन संस्थेवर राष्ट्रीय बंदी आणावी, अशी मागणी आम्ही केली होती. सरकारने त्यांच्या विनंतीवरून एप्रिल 2011 मध्ये केंद्रीय सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तावडे म्हणून जे गृहस्थ आहेत त्यांना पनवेलच्या सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक झाली होती, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या