एक्स्प्लोर

कापड दुकानात कामाला, दांडी मारली, पिस्तुल उचललं, दाभोलकरांना संपवलं, सचिन अंदुरे, शरद कळसकरने काय काय केलं?

Narendra Dabholkar case verdict : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अखेर न्यायालयाचा निकाल आला आहे. आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर वीरेंद्र तावडे (Virendra Tawade), विक्रम भावे (Vikram Bhave) आणि संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) यांना निर्दोष ठरवलं आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar case verdict ) यांच्या हत्येप्रकरणी अखेर तब्बल 11 वर्षांनी निकाल आला आहे. दाभोलकर हत्याप्रकरणातील पाच आरोपींपैकी तिघे निर्दोष तर दोघांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पुणे (Pune) सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे (Sachin Andure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar) या दोघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे (Virendra Tawade), विक्रम भावे (Vikram Bhave) आणि संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) हे तिन्ही आरोपी निर्दोष ठरले आहेत.  विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या कोर्टाने आजचा निकाल दिला. 

कोर्टाच्या या निकालानंतर दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची भूमिका घेतली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी प्रत्यक्ष खटला 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू झाला होता. आज अखेर 10 मे 2024 रोजी कोर्टाने आपला निकाल दिला. 

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी (Sachin Andure and Sharad Kalaskar convicted )

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी कोर्टाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर  यांना दोषी धरलं. या दोघांनीच डॉ. दाभोलकरांवर गोळीबार केला होता. साक्षीदारांनीही या दोघांना ओळखलं होतं.  कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी आहेत. यात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा देण्यात येत आहे, असं कोर्टाने नमूद केलं. 

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच गोळ्या झाडल्या

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच  दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची साक्ष कोर्टात साक्षीदारांनी दिली होती. 20 मार्च 2022 रोजी झालेल्या साक्षीत हे समोर आलं होतं. साक्षीदारांनी आरोपींना ओळखलं होतं.

सचिन अंदुरे कसा सापडला?

मुंबईतील नालासोपाऱ्यात 2018 मध्ये शस्त्रसाठा सापडला होता. वैभव राऊत (Vaibhav Raut) या सनातन संस्थेच्या साधकाच्या नालासोपाऱ्यातील घरातून एटीएसनं स्फोटक पदार्थ जप्त केली होती. याप्रकरणात पाच वर्षांपूर्वी एटीएसनं (ATS) वैभव राऊतला नालासोपारा येथून अटक केली होती. पुढे तपासात शरद कळसकर सापडला. नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला अटक करण्यात आली. 

नालासोपाऱ्यातील स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. स्फोटक प्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांना अटक करण्यात आली. यातील शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. 

कोण आहे सचिन अंदुरे? (Who is Sachin Andure)

सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. 

सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. 

निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप होतं.

दाभोलकर हत्येच्या दिवशी कामावर गैरहजर 

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे औरंगाबादेतील ज्या कापड दुकानात कामाला होता, तिथे तो 20 ऑगस्टला म्हणजेच दाभोलकर यांच्या हत्येदिवशी कामावर गैरहजर होता. सचिन अंदुरे काम करत असलेल्या दुकानाचे मालक कर्मचाऱ्यांचं हजेरी रजिस्टर ठेवतात. त्यात सचिन अंदुरे 20 ऑगस्टला ज्यादिवशी दाभोलकरांची हत्या झाली, त्यादिवशी कामावर नसल्याची नोंद होती. 

CBI चा दावा खरा ठरला

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 9 ऑगस्ट 2018 च्या रात्री नालासोपाऱ्यातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतच्या घरी धाड टाकली होती. या धाडीत त्यांना स्फोटकं सापडली. याप्रकरणी वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसने चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर  यांना 10 ऑगस्टला अटक केली. नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र होते. एटीएसने सचिन अंदुरेला औरंगाबादेतून 18 ऑगस्ट 2018 ला रात्री अटक केली. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसरकर) शरद कळसरकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसने 2018 मध्ये दिली होती. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली होती. सचिन अंदुरे हाच दाभोलकर हत्या प्रकरणातील शूटर होता, असं सीबीआयचं म्हणणं होतं.

शरद कळसकरची कबुली

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरने सचिन अंदुरेच्या साथीनं दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कबुली 2019 मध्ये दिली होती. मनोवैद्यकीय चाचणीत कळसकरने कबुली दिल्याचं सीबीआयनं म्हटलं होतं. 

कोण आहे शरद कळसकर? (Who is Sharad Kalaskar)

शरद कळसकर मूळचा पूर्वीचं औरंगाबाद आणि सध्याचं छत्रपती संभाजीनगरमधील केसापुरीचा रहिवासी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) विवेकानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. दाभोलकर हत्येच्या  पाच वर्षांपासून कोल्हापुरात (Kolhapur) लेथ मशीनवर काम करत असल्याचं शरदने घरी सांगितले होते. वडिलांकडे सहा एकर शेती आहे. शरदला पुणे, सोलापूर, सातारा, नालासोपाऱ्यात घातपाताच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही शरदने दिली होती.

अमोल काळे, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरेला बेड्या

कर्नाटकातील विचारवंत गौरी लंकेश हत्या प्रकरणी बंगळुरु एटीएसने तपास करताना अमोल काळे याला अटक केली होती. दुसरीकडे दाभोलकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने वीरेंद्र तावडेला अटक केली होती. शरद कळसकर हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या हाती लागला. त्यावेळी तपासातच कळसकरचा दाभोलकर हत्येशी संबंध असल्याचे लक्षात आले आणि अधिक चौकशीनंतर त्याचा दाभोलकर हत्येशी थेट संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर कळसकरच्या चौकशीत सचिन अंदुरेचे नाव समोर आले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मित्र आहेत.

कोण आहे वीरेंद्र तावडे?

वीरेंद्र तावडे हा पेशाने डॉक्टर असून, काना, नाक आणि घशाचा तज्ञ आहे. पनवेलमधल्या सनातनच्या आश्रमात तीन वर्षांपासून साधकांची आरोग्यसेवा करतो. 15 वर्षांपासून सनातनचा साधक आहे. 

दाभोलकर कुटुंबाची भूमिका 

दरम्यान, कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर नरेंद्र दाभोलकरांचे सुपुत्र हमीद दाभोलकरांकडून स्वागत करण्यात आलं आहे. मात्र कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ, असं हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.

मास्टरमाईंडचा शोध घ्या; मुक्ता दाभोलकर

ही हत्या एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे, असं सीबीआयच्या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे या कटामागे मोठा मास्टरमाईंट आहे. त्या मास्टरमाईंडचा शोध घेणं गरजेचं आहे. याचा शोध सीबीआयाने घ्यावा, असं मुक्ता दाभोलकर म्हणाल्या.

संबंधित बातम्या

Narendra Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना सश्रम जन्मठेपेची शिक्षा; आरोपी शरद कळसकर, सचिन अंदुरे कोण? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय
राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदाMuddyache Bola Amaravati| बडनेराचा गड राणा दाम्पत्य राखणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?Pankaja Munde : महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय
राज्य सरकारचं पत्र जारी, 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
Embed widget