एक्स्प्लोर

परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!

Parbhani: परभणी शहरातील संवेदनशील घटनांमुळे तापलेल्या वातावरणात आज काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीत दाखल होणार आहेत.

Parbhani: राज्यात परभणी हिंसाचार प्रकरण, नंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यूनंतर राज्यभरात त्याचे गंभीर पडसाद उमटले आहेत. सोमनाथ सुर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम प्रकरणी धक्कादायक अहवाल समोर आल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. विधीमंडळात यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे पहायला मिळाल्यानंतर आज पुन्हा परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत सोमनाथच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यास येणार असून शिवसेना आणि भाजपचे मंत्रीही परभणीत येणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नक्की काय वळण लागतंय याकडे सर्वाचे लक्ष आहे.

परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्यानंतर परभणी बंदच आयोजन करण्यात आलं होतं. या बंदमध्ये काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलन केलं आणि यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली. ज्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुण वकिलाचा मृत्यू झाला. यानंतर सोमनाथच्या अंत्यविधी झाल्यानंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचाही ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.परभणीतील वातावरण या दोन घटनांमुळे चांगलेच तापले होते, याचे विधिमंडळातही पडसाद पाहायला मिळाले.

परभणी शहरातील संवेदनशील घटनांमुळे तापलेल्या वातावरणात आज काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीत दाखल होणार आहेत. त्यांचा दौरा न्यायालयीन कोठडीत मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी असून, त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या घरी ते सांत्वन करणार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर परभणीत बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलन केले, ज्यामुळे पोलिसांनी धरपकड केली. या कारवाईत 35 वर्षीय तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

राहुल गांधी आज शहरात, सांत्वनासाठी जाणार

सोमनाथ यांच्या अंत्यविधीनंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परभणीतील वातावरण चांगलेच तापले होते आणि विधिमंडळात याचे तीव्र पडसाद उमटले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात उत्तर देताना, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची तर विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली. तसेच एका पोलीस निरीक्षकाला निलंबित करून प्रकरणाची न्यायालयीन चौकशी लावली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केले.

आज दुपारी 2 वाजता राहुल गांधी परभणीत दाखल होतील. प्रथम ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटून परिस्थिती समजून घेणार आहेत. त्यानंतर विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करतील.तत्पूर्वी, शिवसेना गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होणार असल्याचे सांगितले. सायंकाळी भाजप नेत्या आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या दोन्ही कुटुंबांना भेट देणार आहेत.

हेही वाचा:

महात्मा गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांचे वादग्रस्त विधान!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, पूर्वेकडील परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | 05 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 05 Jan 2025 | ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 05 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update : काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट, सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर; 19 वळवली, 45 रद्द
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
मुंबईवर धुळीचं सावट! पालिकेचा ढिसाळ कारभार, श्वास गुदमरतोय तरी हवेच्या चेकींगला एकच व्हॅन ती ही बिघडलेली!
Maharashtra Weather Update: सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात काय राहणार तापमानाचा पारा? वाचा IMD अंदाज
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
धक्कादायक! सोयाबीनची खरेदी रखडली, संतप्त शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न 
VIDEO Sudhir Mungantiwar : माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? 
Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांशी ओळख वाढवून महिलेने बाळाला पळवले
Ashish Jaiswal : मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असून ते वैफल्यग्रस्त झालेत; मंत्री आशिष जयस्वालांची जहरी टीका
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
Embed widget