एक्स्प्लोर

राजकारणातील सर्वात मोठी भेट, पंकजा मुंडे-प्रकाश आंबडेकरांच्या भेटीने नव्या राजकारणाची नांदी?

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भेट झाली.

लातूर : वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भेट झाली. लातूरहून बीडकडे येत असताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी घेतली भेट.  प्रकाश आंबडेकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरु आहे. ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे.   त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं.पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण झाली. 

गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अनेकवेळा उपोषण केलं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा मनोज जरांगे यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषण केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

प्रकाश आंबेडकर हे काल दिवसभर लातूरमध्ये होते. आज ते लातूरवरुन बीडकडे निघाले होते. त्याचवेळी पंकजा मुंडे या बीडवरुन लातूरकडे निघाल्या होत्या. त्यावेळी बीड आणि लातूरच्या मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ही भेट नियोजित नव्हती, अचानक भेट झाली. मात्र ही राजकीय वर्तुळातील महत्त्वाची भेट आहे.  

आरक्षण बचाव यात्रा

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) 'आरक्षण बचाव यात्रा' (Arakshan Bachav Yatra) 24 जुलैपासून सुरु झाली आहे. या यात्रेची सुरुवात मुंबईतील (Mumbai) चैत्यभूमीवरुन झाली. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येत आहे. दरम्यान, वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी या यात्रेत सहभागी व्हावं, असं आवाहन वंचितचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यापूर्वीच केलं होतं.  

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालन करत 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.  

आरक्षण बचाव यात्रेचे उद्दिष्ट्ये काय?

ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे.
Sc /St विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे
ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा SC/ST प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे.
SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे.
100 ओबीसी आमदार निवडून आणणे.
55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी.

VIDEO :  प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची भेट

संबंधित बातम्या  

वंचित बहुजण आघाडीची 'आरक्षण बचाव यात्रा' उद्यापासून सुरु होणार, राजकीय नेत्यांना सामील होण्याचं आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रि‍पद, रस्सीखेच सुरुच?Zero Hour Jammu Kashmir : जम्मू - काश्मीरमध्ये 370 वरुन घमासान, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल!Zero Hour Bachchu Kadu Parivartan : बच्चू कडू यांचं 'परिवर्तन'! शिंदेंची साथ सोडत तिसऱ्या आघाडीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
Embed widget