वंचित बहुजण आघाडीची 'आरक्षण बचाव यात्रा' उद्यापासून सुरु होणार, राजकीय नेत्यांना सामील होण्याचं आवाहन
वंचित बहुजण आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) 'आरक्षण बचाव यात्रा' (Arakshan Bachav Yatra) उद्यापासून (24 जुलै) सुरु होणार आहे. या यात्रेची सुरुवात मुंबईतील (Mumbai) चैत्यभूमीवरुन होणार आहे.
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजण आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) 'आरक्षण बचाव यात्रा' (Arakshan Bachav Yatra) उद्यापासून (24 जुलै) सुरु होणार आहे. या यात्रेची सुरुवात मुंबईतील (Mumbai) चैत्यभूमीवरुन उद्या सकाळी 10.30 वाजता होणार आहे. 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे. दरम्यान, वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी या यात्रेत सहभागी व्हावं, असं आवाहन वंचितचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यांनी केलं आहे.
कसा असेल यात्रेचा मार्ग?
आरक्षण बचाव यात्रा ही मुंबई येथून उद्या सकाळी 10.30 वाजता निघणार आहे. उद्या पुणे, दुसऱ्या दिवशी सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालन करत 7 ऑगस्टला औरंगाबाद येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.
प्रकाश आंबेडकरांचे राजकीय नेत्यांना निमंत्रण
राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांना आणि मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार पंकजा मुंडे आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं आहे. निमंत्रण स्वीकारुन हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे राजकारण सध्या सुरू असून, जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे आंबेडकर म्हणाले.
शरद पवारांना आंबेडकरांचे पत्र
आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उद्यापासून आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. या बचाव यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिले आहे. शरद पवारांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
आरक्षण बचाव यात्रेचे उद्दिष्ट्ये काय?
ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे.
Sc /St विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे
ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा SC/ST प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे.
SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे.
100 ओबीसी आमदार निवडून आणणे.
55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी.
महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar: शरद पवारांची कोंडीत? प्रकाश आंबेडकरांनी लिहलं पत्र; काय केली मागणी?
महत्वाच्या बातम्या: