Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेने सतत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होत असलेल्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्येचा (Gadchiroli Crime) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गडचिरोली : मुलचेरा (Mulchera) तालुक्यातील उपकेंद्रात कार्यरत असलेल्या एका 45 वर्षीय कंत्राटी परिचारिकेने सतत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होत असलेल्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्येचा (Gadchiroli Crime) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या त्या पीडित परिचारिकेवर गडचिरोलीच्या (Gadchiroli) जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर पीडित महिलेच्या जबाबावरून सोमवारी उशिरा गडचिरोली पोलिसानी झीरो एफआयआर (Zero FIR) दाखल करत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद म्हाशाखेत्रीवर गुन्ह्या दाखल केला. मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Gadchiroli Crime : अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स, आरोग्य विभागात खळबळ
दरम्यान, पीडित महिला तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी परिचारिका म्हणून कार्यरत आहे. त्यांची दोन वर्षापासून वेतनवाढ थांबवण्यात आली होती. त्यामुळे त्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना व्हाट्सअप मॅसेजवरून संपर्क करायच्या. मात्र तालुका आरोग्य अधिकाऱ्याने चॅटिंगद्वारे शरीर सुखाची मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिचारिका कर्तव्य पार पाडल्यानंतर घरी परतली. ती प्रचंड तणावात होती. रात्री जेवण करून पतीला झोप लागताच तिने विषारी द्रव प्राशन केले. त्यामुळे तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचारांनंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स समोर आल्यानंतर आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. परिचारिकेच्या पतीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर पैसे नको, मला तूच पाहिजेस, असा कथित घृणास्पद दबाव टाकल्याचा थेट आरोप केला असून संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.
Gadchiroli Crime: जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दक्ष भूमिका
दरम्यान या प्रकरणात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दक्ष भूमिका घेतली असून पोलीस तक्रारीची प्रत प्राप्त होताच संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचा प्रस्ताव पाठवला जाईल, असे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी म्हटले आहे.
Raigad Crime : अखेर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडणारे आरोपी जेरबंद
रायगडच्या नेरळ परिसरात मागील आठवड्यात दोघांवर अद्यातांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते यानंतर रायगडच्या पोलिस अधिक्षक आंचल दलाल आणि पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी कर्जतचे पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांना दिले होते यानंतर पोलिसांनी या गोळीबार करणाऱ्यांचा सखोल तपास करत अखेर दोघांच्याही नाशिक मधून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.हा प्रकार पूर्ववैमनस्यातून आल्याचे उघड झाले आहे. दोन्ही आरोपींना 10 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्यावर नाशिक संगमनेर पोलिस ठाण्यात विविध प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अविनाश मार्केकर आणि दीपक कोळी अशी या आरोपींची नावे उघड झालीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























